Ankush tv18 news network
Raver – रसलपुर गावात, कुरेशी मोहल्ला येथे गेले असता शेख युसुफ शेख अस्युब कुरेशी वय-५० व शेख सानिफ शेख युसुफ कुरेशी वय-२५ असे पिता पुत्र असे गोवंश जातीच्या जनावरांचे मास कत्तल करुन ते विक्री करतांना आढळुन आले होते. सदर आरोपी हे पोलिसांना पाहुन गल्ली बोळाचा फायदा घेत पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. सदर व्यक्तींकडुन ०१) २६०००/- रुपये किमतीचे किमतीचे गोवंश जातीच्या जनावराच्या एकुण १३० किलो मांस तसेच धारदार कोयता असे जप्त करण्यात आलेले आहेत.
वरील कार्यवाही करीत असतांना पथकातील अन्य कर्मचारी कुरेशी मोहल्ला येथेच शेख नुरा शेख मुनीर यांचे घराजवळ गेले असतांना तेथे त्यांना पत्रयाच्या शेड मध्ये पिवळा फट बांधुन त्यात आत एक व्यक्ती नामे शेख नईम शेख अय्युब कुरेशी हा गोवंश याची कत्तल करुन विक्री करतांना दिसला परंतु पथक त्याचे पर्यंत पोहचण्याच्या आधीच तो गल्लीबोळाचा फायदा घेत पसार झाला. सदर घटनास्थळावरुन ०१) ५०००/- रुपये किमतीचे गोवंश जातीच्या जनावराच्या एकुण २५ किलो मांस तसेच धारदार कोयता असे जप्त करण्यात आलेले आहेत.
सदर व्यक्तींवर रावरे पोलिस स्टेशन येथे पो.कों / श्रीकांत चव्हाण यांनी सरकारतर्फ फिर्यादी होवुन गुरंन- ९६/२०२६ वे महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम १९९५ वे सुधारीत अधिनियम २०१७ चे कलम ५,५ (ब) (क),९, ९ (ए) (बी), ११ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम
३२५, प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयातील फरार आरोपीचा गुन्हे शोध पथक शोध घेत असुन लवकरच त्याला अटक करण्याची कारवाई करीत आहोत. तसेच सदरच्या गुन्हयात अजुन कोणावा समावेश आहे किवा नाही ? याबाबत सखोल तपास सुरु आहे.
सदर कारवाईत एकूण ३१,०००/- रुपये किमतीचे अंदाजे १७५ किलो वजनाचे गोमास, सुरे जप्त करण्यात आलेले असुन सदरचे गोवंश मास चे पशुवैदयकीय अधिकारी श्री. डॉ रंजीत पाटील नेमणुक – रावेर यांच्या समक्ष नमुने घेवुन त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आलेली आहे.
यापुढे रावेर पोलिस स्टेशन वे पो.नि डॉ. विशाल जयस्वाल हे गोवंश मांस विक्री करणा-यांवर बारीक लक्ष ठेवून अधिक कडक कार्यवाही करण्याचे नियोजन करणार आहोत.
सदर छापा हा मा. श्री. महेश्वर रेड्डी पोलिस अधिक्षक सो, मा. श्री. अशोक नखाते अप्पर पो. अधिक्षक सो. मा. श्री अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षक सो फैजपुर भाग यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पो.नि.डॉ विशाल जयस्वाल, पो.उप. निरीक्षक मनोज महाजन गुन्हे शोध पथकातील पोकों / प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, गजानन बोने, राहुल परदेशी, शुभम काळे यांनी केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.हे.कॉ / सिकंदर तडवी हे करीत आहेत.





