Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » रामानंद नगर पोस्टे गुन्हयातील आरोपी 2 अटक करुन तब्ब्ल 33,79,000/- रु.357 ग्रॅम वजनाचे सोन्याचे, 250 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने मुददेमाल हस्तगत करुन दोन घरफोडी व एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघड केले बाबत

रामानंद नगर पोस्टे गुन्हयातील आरोपी 2 अटक करुन तब्ब्ल 33,79,000/- रु.357 ग्रॅम वजनाचे सोन्याचे, 250 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने मुददेमाल हस्तगत करुन दोन घरफोडी व एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघड केले बाबत

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

Ankush TV18NEWS:

Jalgaon

फिर्यादी लिलाधर शांताराम खंबायत, रा.न्यू पार्वतीबाई काळे नगर, मोहाडी रोड, जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फिर्यादीचे साडु नामे नरेंद्र वाघ हे कामानिमीत्त परदेशी गेले असल्याने दि. 15/05/2025 ते दि.01/06/2025 याकालावधीत त्यांचे बंद घरात अज्ञात इसमांनी राहत्या घराचा मुख्य दरवाजाच्या कड़ी कॉन्डा व कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन घरातील  एकुण- 35,70,000/-रु.कि.चे 357 ग्रॅम वजनाचे सोन्याचे, 25,000/-रु. कि.चे 250 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने व इतर असा एकुण ३६,८३,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला म्हणून रामानंद नगर पोस्टेस गुरनं २०८/२०२५ BNS ३०५-A,३३१ वगैरे प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचा तपास :- मा. पोलीस अधीक्षक जळगाव, श्री महेश्वर रेडडी सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते सो जळगाव, मा.SDPO श्री. नितीन गणापुरे सो, जळगाव भाग जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र गुंजाळ व रामानंद नगर पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकडून गुन्हयातील आरोपींचा कसून शोध सुरु होता. नमुद आरोपींचे शोध दरम्यान रामानंद नगर पोलीस सपोनि/भूषण कोते, पोशि / अनिल सोननी व नितेश बच्छाव चालक प्रमोद पाटील असे रात्रगस्तीवर असतांना दोन इसम संशयीतरित्या फिरतांना आढळून आले. त्यांचा पोलीसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले व त्यांची विचारपुस केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यांचेवरील संशय वाढल्याने दोघांना पोस्टेस आणून अधिक विचारपुस केली असता त्यांनी मोहाडी रोड येथे घरफोडी केल्याची कबुली दिली करीता आरोपी क्र.01) रवि प्रकाश चव्हाण, वय 21 वर्ष रा. तांबापुरा जळगांव. आरोपी क्र.02) शेख शकील शेख रफिक, वय 39 वर्ष रा. मौलीगंज धुळे ह.मु.सालार नगर जळगांव यांना गुन्हयाचे तपासकामी दि.19/09/2025 रोजी अटक करण्यात आली आहे.
[21:06, 26/09/2025] Ankush TV18NEWS: तपासा दरम्यान त्यांनी पुढील प्रमाणे त्यांचे साथीदारांची नावे सांगितली आहे. आरोपी क्र.03) जुनेद उर्फ मुस्तकीम भिकन शहा रा. मच्छीबाजार, तांबापुरा जळगांव ह.मु. मशीद जवळ शिरसोली ता.जि. जळगांव, आरोपी क्र.04) गुरुदयालसिंग मनजित टाक रा.शिरसोली नाका, तांबापुरा जळगांव त्यांना दि.20/09/2025 रोजी गुन्हयात अटक करण्यात आली आहे.     गुन्हयातील अटक आरोपींकडून रामानंद नगर पोस्टेचे खालील प्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

1. CCTNS गुरनं 208/2025 BNS कलम 305 (A), 331(3), 331(4) प्रमाणे, दा. दि. 01/06/2025

2. CCTNS गुरनं 286/2025 BNS कलम 305(A), 331(3), 331(4) प्रमाणे दा.दि. 13/08/2025

3. CCTNS गुरनं 334/2025 BNS कलम 303 (2) प्रमाणे दा. दि.19/09/2025

वरील गुन्हयातील चोरीस गेला मुददेमालाबाबत तपास केला असता, त्यांची सोने व चांदी सुरत व जामनेर येथे विकल्याचे सांगितल्याने तसेच दुचाकी समता नगर परीसरात असल्याचे सांगितले, त्यावरुन रामानंद नगर पोलीसांनी सुरत व जामनेर येथुन एकुण 33,79,000/- रु. किमतीची 310 ग्रॅम सोन्याची लगड व 25,000/- रु. किमतीची 250 ग्रॅम चांदीची लगड व 45,000 रु किमतीची MH-19-BW-9144 अॅक्टीवा दुचाकी असा एकुण 34,49,000/- रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यास रामानंद नगर पोलीसांना यश मिळाले आहे.

नमुद गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि भुषण कोते, पोलीस हवालदार जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, पोलीस नाईक योगेश बारी, विनोद सुर्यवंशी, अतुल चौधरी, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, पोशि/ अनिल सोननी, नितेश बच्छाव, गोविंदा पाटील, दिपक वंजारी, चालक पोलीस हवालदार प्रमोद पाटील अशांनी सहभाग घेवून एकुण 02 घरफोडी व 01 दुचाकी चोरीचा गुन्हे उघडकीस आणुन मुददेमाल हस्तगत करण्यास पश आले आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा