ANKUSH TV18 NEWS
मुंबई

राज्यात आता पोलिसांना गणवेशात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यास महाराष्ट्र पोलीस दलाने बंदी घातली आहे. कारण राज्यातील सर्व पोलिसांना गणवेशात सोशल मीडियावर पोस्ट करण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यात सोशल मीडियावर वाढत चाललेल्या रील्स आणि मिनी-ब्लॉगच्या ट्रेंडला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पोलिस गणवेशात असताना कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून पोस्ट करू नयेत, असे कडक आदेश राज्यातील पोलिस खात्याकडून देण्यात आले आहेत.
राज्यात या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. राज्यातील विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र पोलिस दलातील 51 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात राज्यातील अनेक पोलिस कर्मचारी गणवेशात रील्स मिनी-ब्लॉग किंवा इतर प्रकारचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील पोलिस खात्याच्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, अशा व्हिडिओंमध्ये अनेकदा नकळत सरकारी कार्यालयीन परिसर, शासकीय वाहने, सरकारी उपकरणे किंवा सरकारच्या कर्तव्याशी संबंधित संवेदनशील माहिती दिसून येते. यामुळे पोलिस विभागाच्या शासकीय गोपनीयतेला आणि कार्यात्मक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापुढे राज्यात सोशल मीडियावर पोलिस गणवेशातील अशा प्रकारचेव सरकारी कार्यलयातील व्हिडिओ दिसल्यास संबंधित पोलिस अधिकारी-सरकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
राज्यात या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई पोलीस दलातील सोशल मीडिया लॅबला महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून सरकारी नियमभंगाच्या घटना नोंदवणे आणि वरिष्ठ अधिकार्यांना अहवाल सादर करणे, असे आदेश लॅबच्या अधिकार्यांना राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर खाकी स्वॅग दाखवणाऱ्या व्हिडिओंचा ट्रेंड राज्यात वाढत आहे.
याबाबत राज्यातील काही आमदारांनी महाराष्ट्र विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. राज्य सरकारने जुलै 2025 मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि अधिकृत सोशल मीडिया खाती वेगळी ठेवावीत, शासकीय पदनाम, लोगो, कार्यालयाचा पत्ता किंवा शासकीय मालमत्ता वैयक्तिक खात्यावर वापरू नये, तसेच कोणतीही गोपनीय माहिती पूर्व परवानगी शिवाय सोशल मीडियावर प्रसारित करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. आता राज्यात सरकारी पोलिस कर्मचार्यांना पोलिस गणवेशातील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी बंदी केली आहे, असे राज्यातील पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.




