Home » Uncategorized # e paper » राज्यांच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याचे महिलेशी होते अनैतिक संबंध ! पत्नीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना

राज्यांच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याचे महिलेशी होते अनैतिक संबंध ! पत्नीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना

Trending Photos

Ankush tv18 news network

पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या, अनंत गर्जे याचे महिलेशी होते अनैतिक संबंध ! अवघ्या दहा महिन्यांत संसार मोडला !

परळी  प्रतिनिधी.  राज्यांच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना वरळी परिसरांतून समोर आली आहे. अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीने राहत्या घरी गळफास घेवुन जीवन संपविले आहे. अनंत गर्जे आणि त्याची पत्नी गौरी गर्जे-पालवे या दोघांचा याच वर्षात 7 फेब्रुवारीला मोठ्या थाटमाटात विवाह झाला होता. पण अवघ्या दहा महिन्यांत त्यांच्या संसारावर संकट ओढल्याने परिसरांत हळहळ व्यक्त होत आहे. मात्र डॉक्टर गौरीच्या पतीचे म्हणजेच पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. अशी ही माहिती समोर आहे. मात्र गौरीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्याच ॲक्शन मोडवर आल्या आहेत. त्यांनी वरळी पोलीस ठाण्यात जात पोलिसांशी चर्चा केली. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळी पोलिसांनी गौरी गर्जे-पालवे आत्महत्येप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 108,85,352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनंत गर्जे त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे दीर अजय गर्जे यांच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेला राजकीय वळण देऊ नका, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया स्पष्ट केले आहे. मात्र पंकजा मुंडेंनी देखील स्पष्ट केले आहे की, माझा जर पीए असला तरी कायदा हा सर्वांनाच असतो. त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा