Home » मुंबई बातम्या » रत्नागिरी : रायपाटण येथे दोन वाहनांतून १९ गोवंशाची अवैध वाहतूक करताना तीघांना पकडले

रत्नागिरी : रायपाटण येथे दोन वाहनांतून १९ गोवंशाची अवैध वाहतूक करताना तीघांना पकडले

Trending Photos

रत्नागिरी : रायपाटण येथे दोन वाहनांतून १९ गोवंशाची अवैध वाहतूक करताना तीघांना पकडले

रत्नागिरी – रायपाटण पोलिसांनी कारवाई करत दोन वाहनांतून अवैधरीत्या नेण्यात येत असलेले तब्बल १९ गोवंश जप्त केले आहेत. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायपाटण परिसरात दोन संशयित वाहनं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान वाहनांतून मोठ्या प्रमाणावर गोवंश आढळून आले.

सदर गोवंशाची वाहतूक कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही वाहनं ताब्यात घेऊन आरोपींना अटक केली.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास रायपाटण पोलिसांकडून सुरू आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा