Ankush tv18news network
date-12/10/2025 Jalgaon
बस मध्ये चढणा-या प्रवासाच्या पँटच्या खिशातील पैसे काढून घेणा-या पाकिटमार यांना एमआयडीसी पोलीसांनी केली अटक.

दि. 01/12/2025 रोजी यावल येथील राहणारे शेख कलीम शेख इसाक वय 50 हे त्यांची पत्नीचे मेडीसीन घेणेकामी जळगांव येथील हॉस्पिटल मध्ये आले होते. मेडीसीन घेऊन घरी जाणेकरीता ते जळगांव शहरातील अजिंठा चौफुली येथून बसने घरी जाणार होते. अजिंठा चौफुली येथुन बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पाठीमागून अनोळखी इसमाने त्यांच्या खिशातील 15000/-रुपये रोख त्यांच्या पॅन्टच्या खिशातुन त्यांच्या संमतीवाचून काढून घेतले. सदर प्रकारा बाबत एमआयडीसी पोस्टे येथे अज्ञात व्यक्ती विरुध्द CCTNS no. 877/2025 BNS कायदा कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
तरी मा. पोलीस निरीक्षक सो यांनी एमआयडीसी पोस्टे येथील गुन्हे शोध पथकाला सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे बाबत सुचन्या दिल्या होत्या. त्या प्रमाणे सदर पथकातील अंमलदार यांनी गुप्त माहिती द्वारे व सिसिटीव्ही फुटेजचे बारकाईने निरिक्षण करुन आरोपी यांची माहिती घेऊन आरोपीतांचे नावे निष्पण करीत रजा कॉलनी परिसरातील राहणारे त्यात 01) हमीद अय्युब खान वय 22, रा. बाम्बे बेकरी जवळ अक्सा नगर जळगांव 02) समीर खान अफसर खान वय 22, रा.शेरा चौक जळगांव 03) शोहेब मेहमुद पटेल वय 23 राि.शेरा चौक रजा कॉलनी जळगांव अशांना अटक केले असुन त्यांच्या कडून फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातुन काढून घेतलेले 15000 रुपये हस्तगत करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक सो महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगांव भाग नितीन गणापुरे, व पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ किरण पाटील, पोहेकॉ गिरीष पाटील, पोना प्रदिप चौधरी व पोकों विशाल कोळी यांनी केली असुन पुढील तपास हे पोहेकॉ गिरीष पाटील हे करीत आहेत.





