Ankush tv18 news network
Jalgaon
दि. ०९/१०/२०२५ रोजी २२/०० ते २३ वा. रात्री दरम्यान बोदवड चौफुली, मुक्ताईनगर येथील रक्षा टोफ्यूअल (भारत पेट्रोलियम), कर्की फाटा ता. मुक्ताईनगर येथील मनुभाई अशिर्वाद पेट्रोलपंप, व वरणगांव शिवारातील तळवेल फाटा ता भुसावळ येथील सय्यद पेट्रालपंप या ठिकाणी पाच ते सहा अनोळखी ईसमांनी मोटार सायकलीवर येवून बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा टाकुन रोख रक्कम व मोबाईल फोन तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १,३३,५००/- रु किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला वरुन मुक्ताईनगर पो.स्टे. येथे गुरनं. ३१६/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३१०(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरच्या घटनेनंतर मा.श्री. डॉ. महेश्वर रेड्डी, सो. पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री अशोक नखाते, सो, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव व मा.श्री संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ उपविभाग, यांनी तात्काळ सदर घटनास्थळी भेट देवून नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन गुन्हयातील अनोळखी आरोपी यांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मा. श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना आदेशीत केले.
त्याअनुषंगाने मा. श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव कडील पोउपनि शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाले, जितेंद्र बल्टे, श्रे. पोउपनि, रवी नरवाडे यांचे नेतृत्वात वेगवेगळी ०५ तपास पथके तयार करून गुन्हयातील अनोळखी आरोपी यांचा शोध घेण्याकामी मार्गदर्शन करुन स्वतः वेळोवेळी पथकांसह फिरुन गुन्हयातील अनोळखी आरोपी यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नमुद पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र सतत ४ दिवस मेहनत घेवून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीतांचा मुक्ताईनगर, वरणगांव, ते नाशिक पर्यंत माग काढून त्यांची ओळख पटवुन ०४ आरोपी यांना नाशिक येथुन च ०१ आरोपी व ०१ विधी संघर्षीत बालक यांना अकोला येथून ताब्यात घेवून पुढील तपासकामी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन पांचे ताब्यात देण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशन करीत आहे.





