Ankush tv18 news network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार व आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्काराचे वितरण गंज पेठ पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाला,
शिक्षण महर्षी डॉ, पी, ए, इनामदार यांना यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला, या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील 40 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले,
याप्रसंगी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रमुख मंगेश चिवटे, शिव कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुधीर कुरुमकर, सुदर्शन त्रिगुणाईत, बिशप अजित फरांदे, विजय कचरे सर, आझम कॅम्पसचे विश्वस्त जावेद मुजावर, आसिफ शेख, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गोडेॅ, खजिनदार प्रकाश नानिवडेकर,आदि यावेळी उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन संस्थेचे सचिव अनिल गडकरी सर यांनी केले, आभार शिक्षक अश्फाक शेख यांनी मानले,