Ankush tv18 news network
यावल प्रतिनिधी मुबारक तडवी) :
यावल – फैजपुर महामार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता यांमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतांना दिसत आहे.या रस्त्यावर प्रवास करीत असतांना वाहनंधारकांना तारेवरची कसरत करुन प्रवास करावा लागत आहे .या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस दिवस अपघातांचे प्रमाण वाढतांना दिसत आहे.हा सगळा प्रकार संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना माहिती असल्यावरही या फैजपूर यावल महामार्गाच्या रस्त्यांच्या खड्डयांकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करण्याचे काय कारण असावे ?असा प्रश्न सध्या स्थितीत उपस्थित झाला आहे.आणि वाहनधारकांसह परिसरातील जनतेमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे होणारा त्रासामुळे संबंधित बांधकाम विभागाबद्दल तिव्र संतापाच्या लाटा जनतेमध्ये सध्या स्थितीत जोर धरू लागल्या आहेत.तरी ह्या रस्त्यांच्या खड्ड्यांकडे संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन वाहनधारकांसह ,प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत आणि तात्काळ जागोजागी असलेले खड्डामय रस्ते डांबरीकरण करण्यात यावे अशी रास्त स्वरुपाची मागणी तालुक्यातील जनतेसह वाहनधारक आणि प्रवाशांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांचेकडे मागणी केली आहे..