Home » Uncategorized # e paper » यावल पो.स्टे. येथील खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपी जेरबंद केले बाबत,

यावल पो.स्टे. येथील खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपी जेरबंद केले बाबत,

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

JALGAON ( MRS BHARTI SARWANE )

दिनांक १०/०७/२०२५ रोजी रात्री ९/०० वा. चे सुमारास डोनगांव शिवारातील हॉटेल रायबा समोर प्रमोद श्रीराम बाविस्कर रा. पुनगांव ता. चोपडा जि. जळगांव ह. मु.चंदु आण्णा नगर, जळगांव यांना अज्ञात कारणावरुन एक काळा शर्ट घातलेल्या अनोळखी ईसमाने त्याचे जवळ असलेल्या बंदुकीने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गोळीबार करुन गंभीर जखमी केले व त्याचे अनोळखी साथीदारासह मोटार सायकलने पळून गेले वगैरेचे फिर्यादवचरुन यावल पो.स्टे येथे CCTNS No. २९७/२०२५ भा.न्या. संहिता क. १०९(१),३(५) भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे दि. ११/०७/२०२५ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता, तेव्हा पासुन नमुचा गुन्हा अउघड होता.

मा.डॉ.श्री. महेश्वर रेड्डी सो., पोलीस अधीक्षक, जळगाव, यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरचा गुन्हा स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडे पुढील तपासाकरीता वर्ग केला होता. मा.डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो.. पोलीस अधीक्षक, जळगाव, यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी स्थानीक गुन्हे शाखेचे पोउपनि, सोपान गोरे व पोउपनि, शरद बागल यांचे नेतृत्वात दोन पथक तयार केले. नमुद पचकातील पोउपनि, सोपान गोरे यांनी गुन्हयाच्या अनुशंगाने घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करुन, तांत्रिक विश्लेषण करुन सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. त्यानुसार गुन्हयातील आरोपी शोध कामी पोउपनि, शरद बागल, पोउपनि, सोपान गोरे, पोउपनि, जितेंद्र वल्टे यांचे नेतृत्वात तीन वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना नाशिक, उमटी तसेच अडावद येथे रवाना केले असता नमुद पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी १) दर्शन रविंद्र देशमुख वय २५ वर्ष रा. देशमुख वाडा, अडावद ता. चोपड़ा जि. जळगांव २) गोपाल संतोष चव्हाण वय २५ वर्ष, रा. सोनार गल्ली, मेन रोड, अडावद ता. चोपडा जि. जळगांव यांना नाशिक येथुन ताब्यात घेतले. तसेच आरोपी नामे ३) किशोर मुरलीधर बाविस्कर वय ४० वर्ष रा. सोनू निलाई प्लाझा, मेन रोड, कोल्हे हिल्स, वाघ नगर, जळगांव ४) विनोद वसंतराव पावरा वय २२ वर्ष रा. अमलवाडी ता. चोपड़ा जि. जळगांव ५) सुनिल सुभाष पावरा वय २२ वर्ष रा. उमटी ता. चोपड़ा जि. जळगांव यांना अडावद, आमलवाडी तसेच उमटी येथून त्यांच्या राहत्या परीसरातून ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथे आणून त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून गुन्हयातील आरोपी यांचे जवळून गुन्हा करण्याकरीता वापरलेले अग्नीशस्व व मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. नमूद आरोपी यांना मा. न्यायालयात हजर करुन पोलीस गुन्हयाचा सखोल तपास पोउपनिरी सोपान गोरे करीत आहेत.

सदरची कार्यवाही मा.डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो.. पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव तसेच मा.श्री. विनायक कोते उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, पोंनि. रंगनाथ धारबळे, सपोनि अजयकुमार वाढवे यावल पो.स्टे., पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, पोउपनि, जितेंद्र वलटे, पोहेको सुनिल दामोदरे, पोहेको/प्रिलम पाटील, पोहेको यशवंत टहाकळे, पोहेको/मुरलीधर धनगर, पोहेको प्रविण भालेराव, पोहेको/विलेश सोनवणे, पोहेको संदीप चव्हाण, पोकी बबन पाटील, पोर्का/सिध्देश्वर डापकर, पोको रावसाहेब पाटील, पोकों/ईश्वर पाटील, पोको गोपाल पाटील, चालक पोकों/महेश सोमवंशी, चालक पोकी/बाबासाहेब पाटील सर्व स्थागुशा जळगांव तसेच पोहेकी वासुदेव मराठे, पोहेकी/संदीप सुर्यवंशी, पोना/किशोर परदेशी, पोको/चिन पाटील, पोको योगेश खोंडे, पोको भरत कोळी, पोको सागर कोळी सर्व यावल पो.स्टे. यांच्या पथकाने केली आहे.

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा