Home » Uncategorized # e paper » यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पोलीसांकडून ऑल आऊट/कॉबीग ऑपरेशन मोहीम

यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पोलीसांकडून ऑल आऊट/कॉबीग ऑपरेशन मोहीम

Trending Photos

नगर पालिका निवडणुकीचे पार्श्वभूमीवर यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पोलीसांकडून ऑल आऊट/कॉबीग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली बाबत माहिती…

Ankush tv18 news network

फैजपूर उप विभागातील पावल, फैजपूर, रावेर येथे आगामी होणा-या सार्वत्रीक नगर पालिका निवडणूक-2025 ची महत्वाची प्रकीया सुरू आहे. सदर निवडणूक प्रकीया शांततेत व भय मुक्त वातावरणात पार पडावी तसेथ उप विभागातील अभिलेखावर असलेले गुन्हेगारांवर कायद्याचा प्रभावी अंकुश कायम रहावा त्यांचेकडून सदर निवडणूक प्रकीयेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता मा. महेश्वर रेडडी साधे, पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे आदेश व सुचनान्वये आज दिनांक 21.11.2025 रोजी पहाटे 4.00 ते 7.00 वाजेचे दरम्यान यावल पोलीस स्टेशन हद्दीतील यावान शहर, दहिगाव, साकळी, डांभुर्णी, किनगाव, अट्रावल, निमगाव, अंजाळे येथे कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले.

सदर कोंबींग ऑपरेशन हे मा. महेश्वर रेडडी साधे, पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे आदेशान्वये मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री. अनिल बडगुजर, फैजपूर उप-विभाग फैजपूर यांचे नेतृत्वात राबविण्यात आले. यात मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल बडगुजर, फैजपूर उप-विभाग फैजपुर यांनी व फैजपूर उप विभागातील यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व उप विभागातील 5 पोलीस अधिकारी आणि 39 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला. अधिकारी व अंमलदार यांचे पथकाच्या 5 वेग-वेगळ्या टीम तयार करून NBW/BW वॉरंटातील आरोपी तसेच हदपार, दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले शरीराविरुद्धचे, मालाविरुद्धचे गुन्हेगार व अभिलेखावरील हिस्ट्रीशीटर/आरोपी तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उपद्रव करणाऱ्या रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली. सदर कोंबीग ऑपरेशन दरम्यान तपासणीत,

1. पाहिजे असलेले आरोपी 1 (सागर बाविस्कर) मिळून आला.

2.NBW-10

3.B.W.-6

4. समन्स ची 14 बजावणी करण्यात आली.

5. हिस्ट्रीशीटर तपासण्यात आले- 5

6. तसेच दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले गुन्हेगार-

7. शरीराविरुद्धचे गुन्हेगार व मालाविरुद्धचे दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले गुन्हेगार-21

8. दारूबंदीचे दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले गुन्हेगार- 9

9. हद्यपार आरोपी चेक केले-4

असे मिळून आले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.

आगामी निवडणुक प्रकीया निर्भीड व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की सदर प्रक्रीयेत प्रशासनास सहकार्य करून आपण लोकशाहीतील महत्वाची प्रकीया पार पाडून लोकशाही बळकळ करावी.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा