Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » म.नवनिर्माण सेनेतर्फे गौण खनिज व अवैध वाळू उपसा दिलेल्या निवेदनावर कारवाई शून्य , तहसीलदार यांच्या आशीर्वादाने गौण खनिज व अवैध वाळू उपसा सुरु !

म.नवनिर्माण सेनेतर्फे गौण खनिज व अवैध वाळू उपसा दिलेल्या निवेदनावर कारवाई शून्य , तहसीलदार यांच्या आशीर्वादाने गौण खनिज व अवैध वाळू उपसा सुरु ! 

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

Akush tv8 news network- Special Breaking News

जळगांव तालुक्यात तहसीलदार यांच्या आशीर्वादाने गौण खनिज व अवैध वाळू उपसा सुरु ! निवेदनावर कारवाई शून्य 

Jalgaon– जळगांव तालुक्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात गौण खनिज व अवैध वाळू उपसा सुरु असून त्यांची सर्रासपणे विक्री होत आहे. सदरील अवैध वाळू ही धानोरा, म्हसावद, आव्हाणे, खेडी इ. गावातून मोठ्या प्रमाणात गिरणा नदीच्या पात्रातून अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या मार्फत वाळू काढण्यात येत असून त्यामुळे या पात्रातील नदीचे पात्र हे खोल गेलेले आहे.

नदीपात्रात भरपूर पाणी जमा असल्याने वाळू माफीया यांना नदीपात्रातून मजूरांकडून वाळू उपसा करणे शक्यच होत नाही. त्यामुळे संबंधित वाळू माफिया यांनी आता नविन शक्कल लढविलेली असून सदरील वाळू माफिया हे इलेक्ट्रॉनिक मशीनच्या सहाय्याने रात्रीच्या सुमारास साधारणत ९.०० ते ५.०० या वेळेमध्ये बेसुमारपणे वाळूचे उपसा करुन त्याची मोठ्या हायवा डंम्परने ते रातोरात वाहतूक करुनविल्हेवाट लावीत आहे. असा हा गैरप्रकार वाळू माफिया हे संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग, तलाठी, मंडळाधिकारी, तहसिलदार, प्रांत, प्रांताधिकारी या सर्वांना हाताशी धरुन राजेरोसपणे करीत आहेत. तसेच महोदय साहेब आपणास ही देखील विनंती केली जात आहे की, वरील दोन्ही ठिकाणी तात्काळ महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे पथक रात्र-दिवस बंदोबस्तासाठी थांबविण्यात यावे जेणेकरुन होत असलेला वाळू उपसाला आळा बसेल.

तसेच महत्वाचे म्हणजे अवैधरित्या होत असलेल्या वाळू उपसामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे विहीरीच्या पाण्याची पातळी खूपच खाली गेलेली असून अशीच परिस्थीती जर अजून १ ते २ वर्ष राहिली तर भविष्यात सर्व शेतकरी बांधवांना त्यांचे पिकांसाठी पाणीच विहीरींमध्ये राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच धानोरा, मोहाडी या गावांना पिण्याचे पाणी येथून पुरविले जाते. सद्या प्रधानमंत्री जलमिशन योजना अंतर्गत त्याठिकाणाहून वरील गावांना पाणी पुरविणेबाबतचे काम सुरु आहे. परंतु त्याठिकाणाहूनच वाळू माफिया हे मोठ्या प्रमाणात वाळूची उचल करीत असल्याने तेथे पाण्याचा साठाच शिल्लक राहणार नाही, तरी संबंधित गावांना पाणी कसे पुरविले जाईल ? हा मोठा गंभीर प्रश्न आहे.

तसेच या अवैधरित्या मोठ्या डंम्परने होत असलेल्या वाळू वाहतुक मुळे शेतरस्त्याचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना बैलगाडीचा रस्ता हा खूपच त्रासदायक झालेला आहे. तसेच महत्वाचे म्हणजे तापी पाटबंधारे विभागाने कांताई विभागाने पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधलेल्या असल्याने तेथून मोठ्या जड वाहनांना प्रवेश बंदी असून सुध्दा रात्रीच्या वेळी ९.०० ते ५.०० या वेळेत धरणावर मोठमोठे वाळूने भरलेले हायवे डंम्परने सर्रासपणे वाळू वाहतकू होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहतूकीमुळे बंधाऱ्याचे नुकसान होऊन भविष्यात याठिकाणी एखाद्या वेळी मोठी जिवीतहानी होण्याची घटना घडण्याची दाट शक्यता आहे. धानोरा गावावरुन जाणारे शाळेकरी विद्यार्थी जळगाव ते धानोरा, मोहाडी या ठिकाणाहून सायकलीने वापरीत असतात. व याच रस्त्यावर वाळू वाहतूक करणारे डंम्पर, हायवा डंम्पर, ट्रॅक्टर या वाहनांतून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जात असल्याने ते वाहने जोराने चालतात व रस्त्यावर सायकलीने शाळकरी विद्यार्थी वापरत असल्याने एखाद्या वेळेस शाळकरी विद्यार्थ्यांचा या वाहनाद्वारे अपघात होण्याची देखील दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

महोदय साहेब संबंधित अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या गाड्यावर कुठल्याही प्रकारेच नेम प्लेट नसतात त्यामुळे संबंधित लोक हे मोठ्या प्रमाणात जोराने आपली वाहने रस्त्यावरुन ने-आण करीत असतात. तसेच अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाल्यावर देखील संबंधिता विरुध्द काहीएक कारवाई / गुन्हा नोंदविला जात नाही. कारण या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे वर पर्यंत हात असल्याचे ते बोलून दाखवित असतात. तसेच संबंधितांचे वाहन वगैरे जर एखाद्या वेळी अडविण्यात आले तर संबंधितावर सदरील महसूल विभागाचे कर्मचारी हे थातूर-मातूर प्रमाणात कारवाई करुन पंचनामा करुन सदरील वाहने सोडून देत असतात. यामुळे यांची मोठ्या प्रमाणावर मुजोरी व दहशत वाढलेली आहे.   संबंधित अवैधरित्या वाळू उपसा व गौण खनिज यांचेवर तात्काळ ५ दिवाचे आत योग्य ती कारवाई होऊन सदरील अवैधरित्या होत असलेली वाळू वाहतूक थांबविण्यात न आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाच दिवसानंतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडणार असून यादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी महसूल प्रशासनास जबाबदार राहील याचीकृपया दखल घ्यावी ही विनंती.

निवेदन देतेवेळी   जळगाव महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगर अध्यक्ष प्रकाश जोशी, उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना अविनाश पाटील, ॲड सागर शिंपी शाखाध्यक्ष अनिता कापुरे लक्ष्मी भिल. सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा