Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » मोहमांडली येथे समता फाऊंडेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना कपडे वाटप- टेलरिंग डे साजरा

मोहमांडली येथे समता फाऊंडेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना कपडे वाटप- टेलरिंग डे साजरा

Trending Photos

ankush tv18 news

मोहमांडली (ता. रावेर) :
समता फाऊंडेशन अंतर्गत टेलरिंग डे निमित्त जि. प. शाळा, मोहमांडली येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात आले.
मोहमांडली हे गाव अतिदुर्गम आदिवासी भागात असून येथील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले कपडे मिळावेत, तसेच शिक्षणाबरोबरच त्यांच्यात आत्मसन्मान व आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास शाळेचे शिक्षकवृंद, ग्रामस्थ तसेच समता फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी समता फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करून, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असून, ग्रामस्थांनी समता फाऊंडेशनचे आभार मानले.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा