jalgaon

दि.01/01/2026 रोजी रात्री 08.00 वाजेच्या सुमारास जळगांव शहरातील रायपुर फाटा येथुन फिर्यादी जितेंद्र आत्माराम पाटील यांची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स मोटार सायकल क्र. MH19BK7454 अशी चोरट्यांनी चोरून नेलेली होती. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी दि.06/01/2026 रोजी एम.आय.डी.सी.पो.स्टे.येथे तक्रार दिल्याने गु.र.नं.22/2026, भारतीय न्याय संहिता
कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी मा. पोलीस निरिक्षक श्री बबन आव्हाड साहेब यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोउपनिरि/राहुल तायडे, पोउपनिरि/चंद्रकांत धनके, पोकॉ/2333 विशाल कोळी, पोकॉ/1395 शशिकांत मराठे, पोकॉ/2496 रमाकांत साळुंखे अशांची टिम तयार करून चोरीस गेलेली मोटार सायकल व आरोपीताचा शोध घेणेकामी रवाना केले. गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी व जळगांव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सिसिटीव्ही फुटेजची पाहणी करुन आरोपीताचा शोध घेतला असता तो एम.आय.डी.सी.परिसरातील व्ही सेक्टर याठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विजय मगन कोळी, वय-34 वर्षे, रा. मराठी शाळेजवळ, रायपुर, ता.जि.जळगांव असे सांगितले. नमुद आरोपीतांस विश्वासात घेवून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटार सायकल बाबत विचारपूस केली असता त्याने सदरची मोटार सायकल काढुन दिल्याने ती गुन्ह्यात हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/1336 गफ्फार तडवी हे करित आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते सो, पोलीस उप अधीक्षक श्री नितीन गणापुरे सो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.





