Ankush tv18news network
date-12/10/2025 Jalgaon
स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी मोटारसायकल चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस आणुन ०१ आरोपी अटक केले बाबत.

माजिदअली लियाकतअली रा. उस्मानिया पार्क, शिवाजी नगर, जळगांव हा गॅरेज मॅकेनिकचे काम करणारा त्यास दि. ०६/१२/२०२५ रोजी उस्मानिया पार्क येथुन ताब्यात घेवुन त्याची चौकशी केली असता त्याने जिल्हापेठ पो.स्टे. हद्दीतुन वेगवेगळया ठिकाणाहुन ०४ मोटारसायकली चोरी केल्याबाबतची कबुली दिली होती.
माजिदअली याने दि.०४/०४/२०२५ रोजी धुळे सायकल मार्ट, जवळुन सरताज कलीम मणियार रा. नशिराबाद यांची HF Deluxe मोटारसायकल क्र. MH १९ DK ११७६, दि. २९/११/२०२५ रोजी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथुन प्रशांत गणेश बडगुजर रा. आदर्श नगर, यांची HF Deluxe मोटारसायकल क्र. MH १९ CE ४८९९, तसेच दि. २३/११/२०२५ रोजी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथुन मनोजकुमार बाबुलाल सैनी रा. भगवान नगर, जळगांव यांची Splender Plus मोटारसायकल क्र. MH १९ BC ८४९७, तसेच शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जळगांव येथुन ०१ मोटारसायकल अशा एकुण ०४ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यापैकी ०३ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यास पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास जिल्हापेठ पो.स्टे. करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, मा. श्री नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, तसेच पोउपनि. शरद बागल, सफौ/अतुल वंजारी, पोहेकॉ अक्रम शेख, विजय पाटील, पोना/किशोर पाटील, पोकॉ/राहुल रगडे, रविंद्र कापडणे सर्व स्थागुशा जळगांव तसेच नेत्रम येथील पोकॉ मुबारक देशमुख व सावदा पोलीस स्टेशनचे श्रेपोउपनि. बशीर तडवी यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास जिल्हापेठ पो.स्टे.चे पोना/प्रदीप पाटील करीत आहेत. आरोपी मजकुर हा यापुर्वी मोटारसायकल दुरुस्तीचे काम करीत असल्याने त्यास मोटारसायकल बाबतची माहिती असल्याने मोटारसायकलींची चोरी करीत होता.





