ankush tv18 news network
मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून मोटर सायकल चोरोचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करुन यापूर्वी दोन मोटर सायकल नंतर आज रोजी एक मोटारसायकल हस्तगत केलेबाबत
जळगांव जिल्हा पोलीस अधिक्षक मा. डॉ. श्री महेश्वर रेडडी सो, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगांव मा. श्रीमती कविता नेरकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उप विभाग मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड सो, यांनी पोलीस स्टेशन दाखल असेलेले मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हयांना प्रतिबंध करणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.
दिनांक 08/01/2026 रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन हददीतील दरेगांव व वरखेड गावातून दिवसा दोन मोटर सायकल चोरी झाल्या होत्या त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुरक्र. 07/2026 बी एन एस कलम 303 (2) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. नमुद गुन्हा उघडकीस आणून आरोपीचा शोध घेवून चोरीच्या मोटर सायकल हस्तगत करणेकामी प्रभारी अधिकारी सपोनि श्री प्रविण दातरे यांनी अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार केले होते. नमुद पथकाने तांत्रिक तपास व गोपनिय माहीतीच्या आधारे नमुद गुन्हयातील तीन आरोपी निष्पन्न करुन त्यापैकी आरोपी नामे दादू संजय सोनवणे वय 19 वर्षे रा. दरेगांव ता. मालेगांव जि. नाशिक यास यापूर्वी मालेगांव येथून शिताफीने ताब्यात घेवून त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेली एक व इतर एक अशा दोन मोटर सायकल हस्तगत केल्या होत्या.
त्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासात पुन्हा तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे उर्वरीत मोटारसायकल चोरी करणारा आरोपी नामे 1) सुलतान सलीम शाह, वय-34, रा. दहिवेल, ता. साक्री, जि. धुळे ह.मु. इमदाद नगर मालेगांव यांस दहिवेल येथून दिनांक 11/02/2026 रोजी अटक करुन 3 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली व पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यातील चोरलेली मोटारसायकल ही ऑदाणे येथे विकली असल्याचे सांगितल्याने पोलीस स्टाफसह सदर आरोपीस सोबत घेऊन जाऊन चोरीची मोटारसायकल विकत घेणारा आरोपी नामे विलास दत्तु पिंपळसे, वय 30, रा. औदाणे, ता. सटाणा, जि. नाशिक याला सुध्दा त्याचे राहते घरुन मोटारसायकलसह दिनांक 13/02/2026 रोजी अटक करण्यात आलेली आहे व त्याचेकडून गुन्ह्यातील फिर्यादीची चोरीस गेलेली 30,000/- रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल हस्तगत केली आहे. अशाप्रकारे सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यात चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकली व इतर एक अशा एकूण 90,000/- रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) दादु संजय सोनवणे, बय-19, रा. ग्रेगांव, ता. मालेगांव, 2) भगवान उर्फ लंगड्या सिताराम करंगळ, रा. सोनगांव, ता मालेगांव, 3) सुलतान सलीम शहा, वय 32, रा. दहिवेल, ता. साक्री जि. धुळे यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले असता त्यांनी मिळून संघटीतपणे चाळीसगांव तालुक्यात चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे रेकॉर्ड आढळून आल्याने त्या तिन्ही आरोपीविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 112 प्रमाणे छोटे संघटीत गुन्ह्यांची सुध्दा कारवाई करण्यात आली असून मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक, डॉ. श्री महेश्वर रेडडी सो, मा. अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगांव, श्रीमती कविता नेरकर मॅडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उप विभाग. श्री विजयकुमार ठाकुरवाड सो, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्री प्रविण अ. दातरे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक श्री सुहास आव्हाड, पोलीस उप-निरीक्षक श्री विकास शिरोळे, पोहेकों मोहन सोनवणे, गोकूळ सोनवणे, पोना मिलींद कुमावत, पोकों विनोद बेलदार, राकेश काळे, प्रशांत खैरे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील मा. सपोनि प्रविण दातरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि विकास शिरोळे व पोना/3111 मिलींद कुमावत हे करीत आहेत.




