Ankush tv18 news network
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 आयोगाने निर्गमित केलेल्या
पत्रानुसार जळगाव मुख्यालयात 28 सप्टेंबर 2025 रोजी परिक्षा आयोजित करण्यात आलेली
होती. परंतू आयोगाच्या 26 सप्टेंबर, 2025 च्या प्रसिध्दी पत्रकान्वये ही परिक्षा 9 नोव्हेंबर, 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ.ज्योती गुंजाळ, तहसिलदार, महसूल, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.