Home » ताज्या बातम्या » ” महामार्ग पोलीस नाकाबंदी” पांढऱ्या रंगाचा स्फटीक मेथ एम्फेटामाईन ४३ किलो २६७ ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत ,

” महामार्ग पोलीस नाकाबंदी” पांढऱ्या रंगाचा स्फटीक मेथ एम्फेटामाईन ४३ किलो २६७ ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत ,

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

 

JAGLAON- ( Mr.Bharati Sarwane )  

महामार्ग पोलीस नाकाबंदी !    चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पथक नाकाबंदी  – लाल रंगाची सुझुकीं कंपनीची ब्रेझा चारचाकी कार क्रंमाक DL ०९ CB ७७७१ हस्तगत! 

पांढऱ्या रंगाचा स्फटीक मेथ एम्फेटामाईन निष्पन्न  !  ४३ किलो २६७ ग्रॅम वजनाचा ६४,९०,०५,०००/-रुपये किंमतीचे अंमली पदार्थ हस्तगत 

दिंनाक २४/०७/२०२५ रोजी १९.०० वाजताच्या सुमारास बोढरे ता. चाळीसगाव जि जळगाव शिवारात चाळीसगाव ते छत्रपती संभाजी नगर जाणारे रोडवर महामार्ग पोलीस मदत केंद्र चाळीसगाव समोर रोडवर सार्व. जागी चाळीसगाव महामार्ग पोलीस चे पोलीस उपनिरीक्षक शशीकांत रामदास पाटील व पोलीस पथक नाकाबंदी करीत असतांना, त्यांना लाल रंगाची सुझुकीं कंपनीची ब्रेझा चारचाकी कार क्रंमाक DL ०९ CB ७७७१ ही एक इसम चाळीसगावकडुन छत्रपती संभाजी नगर कडे घेऊन जातांना दिसला. सदर वाहनाच्या चालकाबाबत व नमुद वाहनाबाबत पोलीसांना संशय बळावल्याने, पोलीसांनी सदर गाडीची झडती घेतल्यावर त्यांना नमुद वाहनात डिक्कीत दोन सुटकेस दिसुन आल्या त्या सुटकेसची पाहणी करता त्यांच्यात दोन प्लास्टीकच्या गोण्यामध्ये पांढऱ्या रंगाचा पदार्थ दिसुन आल्याने, पोलीसांना आणखीनच संशय बळावल्याने पोलीसांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांची मदतीने तसेच फॉरेन्सीक टीमच्या मदतीने सदरचा पदार्थ काय आहे? याबाबत खात्री केली असता, सदरचा पदार्थ पांढऱ्या रंगाचा स्फटीक मेथ एम्फेटामाईन असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचा पदार्थ पंचनामा करुन ताब्यात घेतला व नमुद वाहन चालक नामे अब्दुल आसीम अब्दुल आला सय्यद, वय ४८ वर्ष, रा. ए २६३ तिसरा मजला, ब्लॉक ए न्यु फेंडस कॉलनी दक्षिण दिल्ली ह.मु. चिनार अपार्टमेंट प्लॅट नं. ४०५ चौथा मजला, बटला हाऊस जामीयानगर, ओखला नवीदिल्ली यास अटक करण्यात आली तसेच त्याच्या ताब्यातील वाहन जप्त करण्यात आले. तसेच पोउपनिरी शशीकांत रामदास पाटील नेम. महामार्ग सुरक्षा पथक चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.क्रं. २४१/२०२५ NDPS Act १९८५ कलम ८ (क), २२ (क), सह २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नमुद गुन्हयाचे गांभीर्य तसेच व्याप्ती पाहता मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक जळगाव मा. श्रीमती कविता नेरकर सो अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, मा. श्री. विनायक कोते सो, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर उपविभाग अतिरीक्त कार्यभार चाळीसगाव उपविभाग, श्री संदीप पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जळगाव, श्री अमितकुमार मनेळ, पोलीस निरीक्षक, चाळीसगाव शहर यांनी तात्काळ भेटी देऊन नमुद गुन्हयाचा तपासाकरीता स्थानीक गुन्हे शाखा जळगाव तसेच चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे असे ०४ पोलीस अधिकारी व १२ पोलीस अंमलदार यांची ०४ वेगवेगळी पथके तयार केलीत. व अटक आरोपीताकडुन प्राप्त माहीतीच्या आधारे दिल्ली, बेंगलोर, मध्यप्रदेश तामीळनाडु येथे नमुद   गुन्हयाचे अनुशंगाने इतर पाहीजे आरोपीतांचा शोध घेणेकामी पथके रवाना केलीत. नमुद आरोपी क्रंमाक ०१ याने दिलेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे महालिंगम नटराजन वय ६२ वर्ष, रा. पट्टीरोड, विलुदामावडी ता. किझवेलुर नागापट्टम तामीळनाडु यास दिनाक २८/०७/२०२५ रोजी तामीळनाडु येथुन कायदेशीन न्यायालयीन प्रक्रीया पार पाडुन ताब्यात घेऊन, चाळीसगाव येथे आणले त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास दिंनाक ०६/०८/२०२५ पावेतो पोलीस कोठडी रिंमाड मंजुर केली आहे.

नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आरोपी :-

१. अब्दुल आसीम अब्दुल आला सय्यद, वय ४८ वर्ष, रा. ए २६३ तिसरा मजला, ब्लॉक ए न्यु फेडस कॉलनी दक्षिण दिल्ली ह. मु. चिनार अपार्टमेंट प्लॅट नं.४०५ चौथा मजला, बटला हाऊस जामीयानंगर, ओखला नवीदिल्ली (अटक दिंनाक २५/०७/२०२५)

२. महालिंगम नटराजन वय ६२ वर्ष, रा. पट्टीरोड, विंलुदामावडी ता. किझवेलुर नागापट्टम तामीळनाडु (अटक दिनाक ०१/०८/२०२५)

वरील दोन्ही आरोपींना मा. न्यायालयाने ०६/०८/२०२५ पावेतो पोलीस कोठडी रिंमाड मंजुर केली आहे,

नमुद गुन्हयात पाहीजे आरोपी :-

३. योगेश महालिंगम रा. पट्टीरोड, विंलुदामावडी ता. किझवेलुर नागापट्टम, तामीळनाडु

४. दोन अनोळखी इसम नाव गांव माहीत नाही.

वर नमुद आरोपी क्रंमाक ०१ ते ०३ यांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच आरोपीतांचा गुन्हे अभिलेख तपासला असता, मिळालेल्या प्राथमीक माहीतीनुसार आरोपी क्रंमाक ०२ महालिंगम नटराजन वय ६२ वर्ष याच्यावर विवीध प्रकारचे १२ गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी क्रंमाक ०३ योगेश महालिंगम याच्यावर याच्यावर विवीध प्रकारचे ०३. गुन्हे दाखल आहेत.

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा