खरात फाईल्स’ उघडकीस? भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर गंभीर आरोप; २ हजार कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची मागणी ?
Jalgaon | प्रतिनिधी
प्रशासनाची भूमिका काय?
सध्या अधिकृत पातळीवर कोणतीही ठोस कारवाई जाहीर झालेली नसली तरी, तक्रारी प्राप्त झाल्यास आर्थिक गुन्हे शाखा (EOW) किंवा अंमलबजावणी संचालनालय (ED) यांच्याकडून चौकशी सुरू होऊ शकते.
“खरात फाईल्स” या नावाने समोर येत असलेल्या कथित दस्तऐवजांमुळे स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून सादर करणारे अशोक खरात यांच्याविरोधात गंभीर आरोपांची चर्चा रंगू लागली आहे. विविध सूत्रांच्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार, लोकांची फसवणूक आणि बेकायदेशीर संपत्ती उभारल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

माहितीनुसार, अंदाजे २,००० कोटी रुपयांची मालमत्ता विविध मार्गाने जमा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित संपत्ती शासकीय पातळीवर जप्त (forfeit) करण्याची मागणी काही सामाजिक कार्यकर्ते करण्यात आली आहे.
कोणते कायदे लागू होऊ शकतात?
तज्ज्ञांच्या मते, जर आरोप सिद्ध झाले तर खालील कायद्यांअंतर्गत कारवाई होऊ शकते:
- Prevention of Money Laundering Act (PMLA) – बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या पैशांच्या व्यवहारासाठी
- Bhartiya Nay sahita – फसवणूक, विश्वासघात यांसाठी
🏛️ जप्तीची प्रक्रिया कशी होते?
सरकारकडून मालमत्ता जप्त करण्यासाठी:
- संबंधित तपास यंत्रणा (ED / EOW) प्राथमिक चौकशी करते
- पुरावे आढळल्यास तात्पुरती जप्ती (provisional attachment) केली जाते
- न्यायालयीन आदेशानंतरच अंतिम जप्ती (confiscation) होते





