Ankush tv18 news network
भूमी फाऊंडेशन विदर्भ अकोट तर्फे भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन – दास मोबाईल’ गांधी चौक, अकोला यांच्याकडून लाखो रुपयांची बक्षीसवृष्टी
अकोट प्रतिनिधी. निळकंठ वसू..दिनांक 28 सप्टेंबर रोजी भूमी फाऊंडेशन विदर्भ, अकोटच्या अध्यक्षा कु. चंचल पितांबरवले यांच्या पुढाकाराने एक भव्य व भव्य दिव्य गरबा महोत्सव संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे ‘दास मोबाईल’ गांधी चौक, अकोला यांच्या सौजन्याने दिली गेलेली लाखो रुपयांची बक्षिसे.
कार्यक्रमाच्या विशेष उपस्थितीत अकोट कृषी उत्पन्न बाजार सभापती मा. प्रशांत पाचडे, दास मोबाईलचे संचालक, ज्येष्ठ पत्रकार संजय भाऊ आठवले, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार रविराज मोरे, प्रभाकर बोरकर, अरुण भाऊ काकड, निळकंठ वसू पाटील (पत्रकार), माजी नगरसेवक मंगेश भाऊ चिखले, तसेच राजेंद्र पुंडकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमात अकोट तालुक्यातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विविध पारंपरिक वेशभूषेत सादर झालेल्या गरबा नृत्यांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘सत्य लढा’ दैनिक अकोटच्या पत्रकारांनी विशेष सहकार्य केले. एकूणच, अकोट शहरात पारंपरिक आणि सांस्कृतिक वारशाला चालना देणारा, उत्साहपूर्ण असा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.