Home » मुंबई बातम्या » भिवंडीतील ७४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे — आता तुमच्या परिसरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कशी करावी ते जाणून घ्या!

भिवंडीतील ७४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे — आता तुमच्या परिसरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कशी करावी ते जाणून घ्या!

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

भिवंडी महानगरपालिकेने जुलै ते सप्टेंबर २०२५ दरम्यान तब्बल ७४ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले.


ही कारवाई नागरिकांच्या तक्रारीनंतर आणि आरोग्य विभागाच्या तपासणीनंतर करण्यात आली.
मात्र असे बोगस डॉक्टर फक्त भिवंडीतच नाहीत, तर राज्यभरात विविध भागात फसवे उपचार केंद्र चालवत आहेत.

• बोगस डॉक्टर म्हणजे कोण?

ज्याच्याकडे वैद्यकीय शिक्षणाची पदवी (MBBS, BAMS, BHMS, BUMS) नाही,
किंवा ज्याच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) किंवा आयुष विभागाचा नोंदणी क्रमांक नाही,
तो व्यक्ती डॉक्टर म्हणून उपचार करत असेल — तर तो “बोगस डॉक्टर” आहे.

बोगस डॉक्टरांवर कारवाईची प्रक्रिया

पुरावे गोळा करा

त्या व्यक्तीचे क्लिनिक कुठे आहे
बोर्डवरील नाव आणि पदवी तपासा
प्रिस्क्रिप्शनची प्रत, मोबाईल नंबर, फोटो/व्हिडिओ पुरावे जतन करा

संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार द्या

महानगरपालिका आरोग्य विभाग
जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO)
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC)
स्थानिक पोलीस स्टेशन – फसवणुकीचा गुन्हा दाखल करता येतो.

तक्रार WhatsApp वर सुद्धा पाठवू शकता –

“सदर डॉक्टर नोंदणीशिवाय उपचार करत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.”

RTI द्वारे चौकशी करा

जर प्रशासनाने कारवाई केली नाही, तर
RTI अर्जाद्वारे चौकशी करा:

फलाणा डॉक्टराची वैद्यकीय नोंदणी आहे का? परवाना क्रमांक काय आहे?”

हा पुरावा पुढील गुन्हा नोंदणीसाठी उपयुक्त ठरतो.

कायदेशीर तरतुदी  Bombay Nursing Home Registration Act, 1949
Maharashtra Shushrushagruh Registration Rules, 2019

या कायद्यांनुसार नोंदणी नसलेल्या दवाखान्यावर थेट कारवाई करता येते.

• नागरिकांची जबाबदारी

🔸 बिननोंदणी डॉक्टरांकडून उपचार घेऊ नका.
🔸 संशयास्पद व्यक्ती दिसल्यास आरोग्य विभागास किंवा पोलीसांना कळवा.
🔸  WhatsApp, Facebook, Instagram द्वारे जागरूकता मोहीम चालवा.
🔸 “RTI Human Rights Activist Association” सारख्या संघटनांच्या माध्यमातून पुरावे पाठवा.

• लक्षात ठेवा

> “बोगस डॉक्टर म्हणजे आरोग्याचा शत्रू.”
“आरोग्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे.”

भिवंडीतील कारवाईने सिद्ध केले की — जर नागरिक जागरूक झाले, पुरावे दिले, आणि आवाज उठवला तर बोगस डॉक्टरांना तुरुंगवास टाळता येत नाही.

म्हणून आजच ठरवा
आपल्या परिसरात बोगस डॉक्टर नाहीत याची खात्री करा.
संशयास्पद दवाखान्यांची माहिती तात्काळ द्या.

✒️ लेखक : कामेश घाडी
संपादक – RTI Times
अध्यक्ष – RTI Human Rights Activist Association.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा