Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » ब-हाणपुर च्या व्यापारीची चालती गाडी अडवुन बॅग लुटणारे ०७ संशयीत आरोपी रावेर गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद

ब-हाणपुर च्या व्यापारीची चालती गाडी अडवुन बॅग लुटणारे ०७ संशयीत आरोपी रावेर गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद

Trending Photos

ankush tv18 news

ब-हाणपुर च्या व्यापारीची चालती गाडी अडवुन ८ लाख रुपये ची बॅग लुटणारे ०७ संशयीत आरोपी रावेर गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद

रावेर पोलिस स्टेशन हद्यीत दि. ०६-०२-२०२६ रोजी बुन्हाणपुर येथील मसाला व्यापारी दिपक सुरेश धर्मानी यांनी त्यांचे दुकानात कामावर असलेल्या गौरव वाघ व तौफिक तेली यांना नेहमी प्रमाणे त्यांच्या विकलेल्या मालावे पैसे वसुली साठी सावदा, फैजपुर, रावेर येथे पाठवले होते. परंतु वसुली करुन परतांना खानापुर आरटीओ बॅरेल जवळ रात्री ९ वाजेच्या सुमारास गौरव व तौफिक यांनी फिर्यादी यांना कॉल करून कळविले कि, त्यांची पैसे भरलेली बॅग ८ ते ९ इसम दुचाकी अडवुन हिसकावुन घेवुन गेले आहे. त्यावरुन रावेर पोलिस स्टेशन ला दि. ०७/०२/२०२६ रोजी गु.रं.नं ५२/२०२६ भा.न्या. संहीता कलम ३१६ (२), ३ (५), ३१० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयात रावेर पोलिस स्टेशन वे पोलिस निरीक्षक यांनी रावेर गुन्हे शोध पथकाला तात्काळ सुचना दिल्या नुसार तपासाला लागलीच सुरवात करण्यात आली होती. परंतु रात्रीचे वेळ असल्याने सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपीतांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. तसेच घटनास्थळाजवळ कोणतेही कॅमेरे नसल्याने तपासात आरोपीतांचा जाण्याचा मार्ग कोणता हे स्पष्ट होत नव्हते. सदर गुन्हयाच्या तपासात पोलीसांनी रावेर शहर, सावदा, फैजपुर येथील एकुन ६७ सीसीटीव्ही फुटेज तपासल्या परंतु गुन्हयास उपयुक्त काही एक माहीती प्राप्त होत नव्हती. परंतु गुन्हयाच्या तपासात कोणीतरी फिर्यादीयांच्या दिवसभराव्या संपूर्ण कामकाजावर बारीक लक्ष ठेवून सदर गुन्हा केला असल्याचे दिसत होते. म्हणून फिर्यादी यांचे दुकानावर वसुलीसाठी असणा-यांनीच लुटमारीचाच खोटा बनाव तर केला नाही? या बाबत तपास करण्यात आला होता. परंतु काही एक माहीती मिळत नव्हती. त्यावेळेस पो.नि.डॉ. विशाल जयस्वाल यांना आरोपीतांबाबत गोपनीय

माहीती प्राप्त झाले वरुन ०१) फारुख शेख रईस वय-१९ ०२) अत्ताउल्लाह खान दाउद खान @ सोनु ०३) शेख सईद शेख कादर सुपडु ०४) शेख समीर शेख कलीम चिकु ०५) राहील खान दाउद खान ०६) रहेमान खान अय्युब खान भुऱ्या ०७) अक्रम खान इस्माईल खान सर्व रा. बंडु चौक रावेर यांना विश्वासात घेवुन विवारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्यावे कबुल केल्याने सदर गुन्हयात आजपावेतो वरील आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपी शेख हसन शेख अफजल उर्फ हसन फावड्या रा रुस्तम चौक रावेर हा सुगावा लागताच फरार झालेला आहे सदर आरोपीतावर रावेर पोलीस स्टेशन ला बरेच गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे. रावेर गुन्हे शोध पथक त्याचा कसुन शोध घेत आहेत.

आरोपीतांकुडुन आज पावेतो गुन्हयात ९५,०००/- रु किमतीची दोन मोटार सायकल तसेच २,५५,०००/- रुपये रोख असे ३,५०,०००/- रुपये किमतीचा एकुन मुदेमाल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आलेला आहे.

आरोपीतांना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची २६/०२/२६ पावेतो पोलिस कोठडीत स्वाणगी करण्यात आलेली असुन आरोपीतांकडून गुन्हयाबाबत सखोल तपास चालु आहे.

सदर कार्यवाही ही मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी सो पोलिस अधिक्षक जळगांव , मा. श्री अशोक नखाते सो अप्पर पो. अधिक्षक जळगांव विभाग, मा.श्री अनिल बडगुजर पोलिस उपअधिक्षक फैजपुर विभाग, गा. श्री अण्णासाहेब घोलप पोलिस उपअधिक्षक चोपडा विभाग (अति. कार्यभार) यांच्या मार्गदर्शनाने पोलिस स्टेशन रावेर मधील पो.नि.डॉ विशाल जयस्वाल, पो.उप. निरीक्षक तुषार पाटील पो.हे.कॉ सुनिल वंजारी गुन्हे शोध पथकातील कल्पेश आमोदकर श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकारोधीन शेख, अतुल गाडीलोहार, गजानन बोने यांनी केला आहे. तसेच सायबर पोलिस स्टेशन चे गौरव पाटील व मिलींद जाधव यांनी वेळोवेळी तांत्रिक माहीती दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.उप. निरीक्षक तुषार पाटील हे करीत आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा