Ankush tv18 news network
अकोट प्रतिनिधी: निळकंठ वसू पाटील
तालुका अकोट येथील वरूर जऊळका गावात देशी दारू दुकानाच्या माध्यमातून अवैधपणेरोज 50 ते 60 पेट्या दारू ग्रामीण भागात विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील चार नागरिकांनी अवैध दारू विक्री विरोधात तक्रार केल्यानंतर देखील प्रशासनाची कारवाई केवळ थातूरमातूर असल्याचा आरोप होत आहे.जवळ असलेल्या गावात थातूर मातुर कारवाईप रवाना धारक दुकानदार मनमानीपणे दारू विक्री करत असून, स्टॉक रजिस्टर, व्हिजिट बुक व नोकरनामा यांची तपासणी आवश्यक असतानाही उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. “चिल्लर केस केल्यापेक्षा फांद्यांऐवजी मुख्य खोडावर वार केला पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण जनतेतून उमटत आहे.
दारू विक्रीसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याचे उघड झाले असून, याला उत्पादन शुल्क विभाग आणि दुकानदार यांच्यातील मधुर संबंध कारणीभूत असल्याची नागरिकांची ठाम भूमिका आहे. सहा महिन्यांत एकदा केवळ कारवाई करून विभाग कार्यरत असल्याचा देखावा करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
पोलीस विभाग केवळ दुकानाबाहेर व अवैध विक्रीवर कारवाई करू शकतो, मात्र दुकानातील स्टॉक तपासण्याचा अधिकार केवळ उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. अशा परिस्थितीत गावातील लोकसंखेच्या तुलनेत दररोज होत असलेली दारू विक्री संशोधनाचा विषय ठरतो.
तालुक्यातील संपूर्ण खारपाण पट्टा ‘दारूपाण पट्टा’ बनल्याची गंभीर स्थिती आहे. याला फक्त पोलिसांना दोष देऊन काही उपयोग नाही. बिट जमादार यांची जबाबदारी असली, तरी मुख्य दोष उत्पादन शुल्क विभागावर जातो.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामीण पत्रकार संघटनेमार्फत जिल्हाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व पालकमंत्र्यांना पुराव्यानिशी निवेदन देण्यात येणार आहे. परवाना धारक दुकानदारांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा सामाजिक संघटना कायदा हातात घ्यायला मागेपुढे पाहणार नाहीत असा इशारा दिला आहे