Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » बसस्थानक, पाचोरा येथे तिन संशयीत महिला ताब्यात-गुन्हयात चोरी झालेला मुददेमाल हस्तगत

बसस्थानक, पाचोरा येथे तिन संशयीत महिला ताब्यात-गुन्हयात चोरी झालेला मुददेमाल हस्तगत

Trending Photos

ankush tv18 news network

PACHORA

दिनांक ०३/११/२०२५ रोजी दुपारी १५.१५ ते १५.४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी नामे श्रावण ताराचंद पाटील, वय, ७० वर्षे, धंदा. शेती, रा. वडगांव खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगांव हे पाचोरा बसस्थानक, पाचोरा येथे बसमध्ये चढत असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे पॅन्टच्या खिशातुन त्यांचेजवळ असलेले १३,४००/- तेरा हजार चारशे रुपये लबाडीचे उददेशाने त्यांचे संमतीशिवाय चोरी करुन चोरुन नेले बाबत पाचोरा पोलीस ठाणे गु. रजि. क्रमांक ५११/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक ०४/११/२०२५ रोजी अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ/१४२२ शरद मांगो पाटील, पोकॉ/०१३२ श्रीराम अनिल शिंपी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने बसस्थानक, पाचोरा येथे तिन संशयीत महिला हया पिकपॉकेट व टेहळणी करीत असल्याची बातमी मिळताच बसस्थानक, पाचोरा येथे जावुन सदर महिला हया मिळुन आल्याने त्यांना पाचोरा पोलीस ठाणे येथे आणुन त्यांना पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांनी त्यांना त्यांचे नाव, गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव १) निर्मला सुनिल जोशी, वय. ३३ वर्षे, रा. गंगापुरी, ता. जामनेर, जि. जळगांव २) सोनाली गणेश विधाते, वय. २४ वर्षे, रा. मु. हिसोडा खुर्द, पोस्ट. सेलुद, ता. भोकरदन, जि. जालना, ह.मु. कुंभारी, पोस्ट. तोंडापुर, ता. जामनेर, जि. जळगांव ३) उषाबाई तेजराव ऐकणार, वय. ५५ वर्षे, रा. कुंभारी, पोस्ट. तोंडापुर, ता. जामनेर, जि. जळगांव असे सांगीतल्याने त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पंचासमक्ष व महिला पोलीस अंमलदार यांचेसमक्ष त्यांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत आरोपी क्रमांक १ यांचेकडुन १३,५००/- रुपये, आरोपी क्रमांक २ यांचेकडुन ६,६००/- रुपये, आरोपी क्रमांक ३ यांचेकडुन १२,३००/- रुपये असे एकुण ३२,४००/- रुपये जप्ती पंचनामा करुन जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक सोो, श्री. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक सो, चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी सोो, श्री. बापु रोहम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, पोहेकॉ/६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकॉ/०३८५ अशोक रामचंद्र हटकर, पोकॉ/१४२२ शरद मांगो पाटील, पोकॉ/०१३२ श्रीराम अनिल शिंपी, मपोकॉ/२९२३ प्रियंका अर्जुन आहेर, पोकॉ/१२३० योगेश पाटील, पोकॉ/०९९० संदिप राजपुत, मपोकों/महोमगार्ड/२२५८ सोनाली शशीकांत पाटील, महोमगार्ड/१३९७ कल्पना तानाजी निंबाळकर, महोमगार्ड/१४९९ संगीता मुरलीधर पाटील, यांनी पार पाडली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा