ankush tv18 news network
jalgaon
जळगांव बसस्टँड येथे बस मध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळयातुन वारंवार मंगळसुत्र पोत चोरी होत असलेबाबत बाबत दाखल गुन्हयांच्या अनुषंगाने समांतर तपास करणेबाबत मा पोलीस अधिक्षक सो डॉ महेश्वर रेड्डी सो यांनी मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना आदेशित केले होते. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांचे तपास पथकाने संशयीत महिला नामे १) माया दहिमल भोसले उर्फ माया उदय पवार वय २० वर्ष २) अंकीता अर्जुन पवार वय ३५ वर्ष, दोन्ही रा. पळासखेडा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडेस विश्वासात घेऊन सखोल विचारपुस केली असता वर नमुद दोन्ही महिलांनी जळगांव बसस्टँड येथे मागील एक ते दिड महिन्यापुर्वी दोन वेळेस बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळयातील मंगळसुत्र पोत चोरी केल्याची कबुली दिली.

नमुद महिला यांनी दिलेल्या कबुली प्रमाणे मंगळसुत्र पोत चोरी बाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनकडील अभिलेखाची पाहणी करता जिल्हापेठ पो.स्टे. येथे १) गुरनं. ३१५/२०२५ BNS ३०३(२) व २) गुरनं. ३१८/२०२५ BNS ३०३ (२) प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयात नमुद महिला यांनी चोरी केलेला मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे. वर नमुद महिलांना पुढील तपासकामी मुद्देमालासह जिल्हापेठ पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास जिल्हापेठ पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, मा. श्री नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, तसेच पोउपनि,, जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, श्रे. पोउपनि. रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, पोहेकॉ/हरीलाल पाटील, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, पोअ. गोपाल पाटील, राहुल कोळी, मपोहेकॉ/अभिलाशा चऱ्हाटे, मपोना, श्रध्दा सोनवणे, मपोअ. दर्शना पाटील, प्रियंका कोळी, मंगला तायडे, चालक पोहेकॉ दिपक चौधरी सर्व स्थागुशा जळगांव यांनी केली आहे.





