ankush tv 18 news network
चाळीसगाव, जि जळगाव
बघा सरकार, बघा.. काय हालत आहे शेतकर्यांची..

आधी अतिवृष्टी आता अवकाळी जेमतेम हाती लागलेल पिक ही वाया जात आहे आणि मुख्यमंत्री म्हणयातं की ,ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही..तशी तरतूद नाही..
कराना मग तरदूत, नैसर्गिक आपत्तीतून शेतकर्यांना सावरण्यासाठी ओला दुष्काळ हे धोरण अंमलात आणा.
तीन दिवस झाले सारखा जोराचा पाऊस पडतोय काढणीला आलेलं कापूस खराब होतांना बघून अक्षरशा शेतकर्यांचा जिव जळतोय,
शेतकर्यांनी जगावं की मरावं अशी परिस्थिती झाली आहे
मुख्यमंत्री फडणवीस दादा,तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी लावू नका,
आधिक अंत बघू नका ..शेतकर्यांचा संयम सुटला तर पळायला जागा नसणार ….
भिमराव जाधव ( शेतकरी बचाव कृती समिती चाळीसगाव, जि जळगाव )





