Home » ताज्या बातम्या » फिर्यादी यांचे ताब्यातून हिसकावून नेलेली रोख रक्कम गुन्हयातील आरोपी विजय शांताराम पाटील जितेंद्र छोटुलाल जाधव कडुन हस्तगत

फिर्यादी यांचे ताब्यातून हिसकावून नेलेली रोख रक्कम गुन्हयातील आरोपी विजय शांताराम पाटील जितेंद्र छोटुलाल जाधव कडुन हस्तगत

Trending Photos

Ankush tv18 news network

Jalgaon

दि.१५/११/२०२५ रोजी फिर्यादी नामे विलास मधुकर जाधव वय ६७ वर्ष रा. जुनी जोशी कॉलनी, जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं. ८४१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) प्रमाणे अज्ञात आरोपी यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता

त्यानुसार मा. श्री राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन   गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना दि.२३/११/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनिय माहिती व तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपी नामे

१) विजय शांताराम पाटील वय ४१ वर्ष रा. कलावसंत नगर, जळगांव   २) जितेंद्र छोटुलाल जाधव वय ४४ वर्ष रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगांव

यांना ताब्यात घेवुन त्यांनी फिर्यादी यांचे ताब्यातून हिसकावून नेलेली ८,००,०००/- रु ची रोख रक्कम त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आली आहे. नमूद आरोपी यांना गुन्हयाचे पुढील तपासकामी एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पो.स्टे. करीत आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. श्री डॉ महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगांव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव परिमंडळ, मा. श्री नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, तसेच पोउपनि, शरद बागल, सोपान गोरे, पोहेकों प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सलोम तडवी, पोकों/सिध्देश्वर डापकर, रतनहरी गिते, मयुर निकम, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे सर्व स्थागुशा जळगांव तसेच नेत्रम येथील पोकों/पंकज खडसे, पोकों/मुबारक देशमुख, पोको/ कुंदनसिंग बयास व सायबर येथील पोकी/ गौरव पाटील, मिलोद जाधव यांनी केली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा