Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे “ वरिष्ठांना पाच महिन्यापूर्वी माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” अशी पाठवलेली लेखी सूचना

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे “ वरिष्ठांना पाच महिन्यापूर्वी माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” अशी पाठवलेली लेखी सूचना

Trending Photos

ANKUSH TV18NEWS NETWORK

FALTAN –फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे “ वरिष्ठांना पाच महिन्यापूर्वी माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” अशी पाठवलेली लेखी सूचना 

वरिष्ठांना पाच महिन्यापूर्वी  माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” अशी पाठवलेली लेखी सूचना
रिष्ठांना पाच महिन्यापूर्वी माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” अशी पाठवलेली लेखी सूचना
पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकलेल्या या डॉक्टरांनी अखेर मानसिक तणावाला कंटाळून आत्महत्या
 पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकलेल्या डॉ. संपदा मुंडे या डॉक्टरांनी अखेर मानसिक तणावाला कंटाळून आत्महत्या
पोलिस PSI गोपाल बदने यांनी चार वेळा शारीरिक अत्याचार
पोलिस PSI गोपाल बदने यांनी चार वेळा शारीरिक अत्याचार

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा आणि संतापाची लाट उसळली आहे. डॉ. मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधी आपल्या हातावर सुसाइड नोट लिहिली असल्याचे समोर आलं आहे.
काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकलेल्या या डॉक्टरांनी अखेर मानसिक तणावाला कंटाळून स्वतःचा जीव घेतल्याची माहिती समोर येत आहे.
डॉ. मुंडे या काही दिवसांपासून वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादामुळे सतत चौकशीला सामोऱ्या जात असल्याची माहिती समोर आली होती. “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” अशी तक्रार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात दिल्याचे समजते. मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी काल उशिरा रात्री आत्महत्या केली.घटनास्थळी तपासादरम्यान डॉक्टरांच्या हातावर लिहिलेली एक सुसाईड नोट आढळली. त्यात त्यांनी पोलिस PSI गोपाल बदने यांनी चार वेळा शारीरिक अत्याचार केल्याचा आणि पोलिस कर्मचाऱ्याने प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या खुलाशामुळे पोलिस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयात शोककळा पसरली असून डॉक्टर व आरोग्य कर्मचारी मोठ्या धक्क्यात आहेत. सहकाऱ्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा