Ankush tv18 news network
विश्व नेते, राष्ट्रपुरुष प्रधानमंत्री मा.श्री नरेंद्र मोदीजी यांच्या आज जन्म दिनाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता अभियान भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मंडल क्र.१ मधील नेरी नाका येथील स्मशानभूमी इथे राबविण्यात आली सदर अभियान आमदार श्री सुरेश दामू भोळे (राजू मामा), महानगर जिल्हाध्यक्ष श्री दीपक जी सूर्यवंशी, सेवा पंधरवाडा अभियान संयोजक विजय वानखेडे, स्वच्छता अभियान संयोजक राजेंद्र मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी सरचिटणीस जयेश भावसार, अशोक राठी, शक्ती महाजन, संतोष इंगळे, श्रीमती रेखा वर्मा, सौ ज्योतीताई निंभोरे, सौ वंदनाताई पाटील डॉ. मनोज टोके, संदीप तेले, प्रकाश पंडित, प्रकाश बालानी, डॉ. वीरेंद्र खडके, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, सौ दीपमाला ताई काळे, सौ दीप्ती ताई चिरमाडे, सौ चित्राताई मालपाणी, सौ संगीता ताई पाटील, राहुल घोरपडे, महेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते स्वच्छता अभियानात संख्येने सहभागी झाले.