Ankush tv18 news network
jalgaon

‘पोलिस रेझिंग डे’ (Police Raising Day) किंवा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन हा 02 जानेवारी रोजी साजरा केला जातो, कारण 1961 मध्ये याच दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता आणि तो दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणून घोषित केला गेला. या दिवसाच्या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रम आणि जनजागृती मोहिम राबवल्या जातात, जसे की विद्यार्थ्यांसाठी रॅली, शस्त्रांचे प्रदर्शन आणि सायबर सुरक्षा यांसारख्या विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
‘पोलिस रेझिंग डे’ निमित्त मा.श्री.डॉ. महेश्वर रेड्डी सो यांच्याकडून दिनांक :- 02/01/2026 रोजी सकाळी 08:55 वाजता पोलीस कवायत मैदानावर पोलीस परेड संचालनाचे आयोजन करण्यात आलेले होते . सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री . रोहन घुगे, जिल्हाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. पोलीस परेड संचालनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा.श्री.रोहन घुगे जिल्हाधिकारी जळगाव यांचे सोबत पोलीस अधीक्षक मा.श्री. डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री .अशोक नखाते , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे , राखीव पोलीस निरीक्षक श्री .प्रशांत सुगरवार उपस्थित होते. परेड चे कमांडर SDPO भुसावळ श्री. केदार बारबोले , RSI श्री. सचिन चिवंडे हे सेकंड परेड कमांडर होते. परेड संचलन करिता 09 पोलीस अधिकारी , 222 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.
प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी श्री . रोहन घुगे यांचे स्वागत करून त्यांना मानवंदना दिली.राष्ट्रीय सॅल्युट, हर्ष फायर करून ध्वजसंचलन,परेड निरीक्षण झाले. सदर प्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ श्री .महेश्वर रेड्डी यांनी प्रास्ताविक केले , प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी श्री . रोहन घुगे यांनी शुभ संदेश दिला. अपर पोलीस अधीक्षक श्री . अशोक नखाते यांनी आभार प्रदर्शन केले. परेड संचलन संपल्यानंतर प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी मा.श्री. रोहन घुगे ,पोलीस अधीक्षक मा.श्री.डॉ.महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक श्री.अशोक नखाते,यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेले शांतिदूत संघटनेचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी / शालेय विदयार्थी / पोलीस कुटुंबीय यांचे भेटी घेतल्या. सदर प्रसंगी PI. राहुल गायकवाड ,PI. सतीश गोराडे , PI. संजय गायकवाड,PI.कावेरी कमलाकर ,PI.फारुख तडवी ,API निलेश राजपूत , PSI.शरद बागल,सोपान गोरे,जितेंद्र वाल्डे नेम.स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचेसह जळगाव शहरातील पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते .
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी GPSI.मुझ्झफर सैय्यद , GPSI.राजेश वाघ , ASI. पंडित वानखेडे HC. रज्जाक अली सैय्यद , HC.संभाजी पाटील , HC.नरेंद्र वारुळे , HC. जयवंत चौधरी,HC.चंद्रकांत पाटील , PC.जितेंद्र चौधरी ,HC.संजय महाजन , यांनी HC. संतोष सुरवाडे , HC. मेघना जोशी , HC. किरण सपकाळे , PC. सुभाष धिरबस्ती , PC. संदीप पाटील , PC. पंकज शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन HC . विनोद अहिरे यांनी केले. परेड संचलन कार्यक्रमास ला .ना .विद्यालय , इकरा विद्यालय , का .उ . कोल्हे .विद्यालय , पं . न . लुंकड हायस्कूल , के के उर्दू विद्यालय , A. T . झांबरे विद्यालय मधील विदयार्थी उपस्थित होते.





