Ankush tv18 news network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
बेकायदेशीर बांधकामाला पाठीशी घालणाऱ्या पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून निलंबित करावी – रिपब्लिकन सेना युवक आघाडीची मागणी,

नारायण पेठ येथील बांधकामाची परवाने रद्द करणेबाबत व तसेच बांधकाम विभाग विकास झोन क्रमांक सहा कडून संबंधित बांधकामाचे नकाशे मंजूर करून घेतले असून त्यांची मंजुरी ही बेकादेशीर आहे महापालिका व प्रशासन यांच्यातील साठे लोटे आहे सदर बांधकाम पूररेषेत ब्ल्यू वर रेड लाईटच्या जवळ आहे, त्या अनुषंगाने संबंधित कामाबद्दल व कर्तव्य कसूर केल्या प्रकरणी बेकायदेशीर बांधकामाला पाठीशी घालणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील बांधकाम विभागामधील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावी, या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रिपब्लिकन सेना युवक आघाडीच्या वतीने बेमुदत अमरण उपोषण करण्यात आले आहे,
यावेळी रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवराज बनसोडे, पुणे शहर अध्यक्ष हनुमंत अण्णा पपूल, रिपब्लिकन सेना युवक आघाडी पुणे शहर अध्यक्ष अजय भालशंकर, रिपब्लिकन कामगार सेना पुणे शहर अध्यक्ष मिलिंद सरोदे, रिपब्लिकन सेना महिला आघाडी अध्यक्ष स्नेहाताई गायकवाड, दादा धुमाळ उपाध्यक्ष पुणे शहर, दिनेश राखपसरे, रेहान अन्सारी, यश राख पसरे, दत्ताभाऊ शेंडगे सरचिटणीस पुणे शहर, समाधान कारंडे, बाबा पाटोळे, अनिल खलसे, कैलास अवचिते आदि यावेळी उपस्थित होते,