Ankush tv18news network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
मुलींनी अधिकारी होण्यासाठी जिद्द चिकाटीने स्पर्धा परीक्षा मध्ये उतरणे गरजेचे, ” संगीता शिंदे (अल्फान्सो) सहआयुक्त पुणे लष्कर पोलीस ठाणे,
मुलींनी पोलीस अधिकारी होण्यासाठी जिद्द चिकाटीने स्पर्धा परीक्षेमध्ये उतरणे गरजेचे आहे असेच आपल्या आरोग्य (फिटनेस) राखणे गरजेचे आहे, असे मत पुणे लष्कर पोलीस ठाण्याचे सहआयुक्त संगीता शिंदे (अल्फान्सो) यांनी व्यक्त केले, पुणे कॅम्प येथील सेंट अँन्ड्रय़ूज हायस्कूल फॉर गर्ल्स या शाळेमध्ये क्रीडा गणवेश व क्रीडा साहित्य वाटप वितरण सहआयुक्त संगीता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे आयोजक सनी इलेव्हन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंत भोसले, जयंत देशपांडे, श्रीमती रजनीबाई साळवी, शिवसेनेचे शिक्षक शिक्षकेतर संघाचे जिल्हाप्रमुख अनिल गडकरी सर, सुधीर साळुंखे, जनाज सर आदि यावेळी उपस्थित होते,
शाळेचे शिक्षिका मारिया देठे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना साठे यांनी मानले,