Ankush tv18 news network
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
नवरात्र महोत्सव निमित्त पुणे कॅम्प येथील कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने कॅम्प एज्युकेशन सोसायटी कन्या विभाग या शाळेतील गरजू विद्यार्थिनींना बूट वाटप करण्यात आले, यावेळी आयोजक कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विशाल मोरे, विनायक राठोड, सुरज ठोकळ, प्रदीप शिंदे, राजू शेट्टी, तसेच शाळेतील शिक्षिका मीना साळुंखे, व सपकाळे मॅडम उपस्थित होते, दरवर्षी विविध ठिकाणी ट्रस्टच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न केले जात आहे अशी माहिती कॉन्व्हेंट स्ट्रीट मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विशाल मोरे यांनी सांगितले