Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृह भ्रष्टाचार- अंदाज समितीच्या सदस्यांच्या नावावर खंडणी -घटनेची चौकशी करण्याचे समितीना पत्र

धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृह भ्रष्टाचार- अंदाज समितीच्या सदस्यांच्या नावावर खंडणी -घटनेची चौकशी करण्याचे समितीना पत्र

Trending Photos

ankush tv18 news network

Dhule –  अंदाज समितीच्या सदस्यांच्या नावावर खंडणी गोळा केली. त्यापैकी दोन सदस्यांचा समावेश असलेल्या नीती मूल्य समितीला कोणते नितीमूल्य ?

* धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृहाच्या १ कोटी ८४ लाख ८४ हजार २०० रुपयांच्या भ्रष्टाचारापासूनच कामाला सुरुवात करा !

* अनिल आण्णा गोटे यांचे नीती? मूल्य ? समितीच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांना पत्र

धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहाच्या कक्ष क्र. १०२ या कक्षात विधानसभा सदस्य व अंदाज समितीचे अध्यक्ष सदस्य अर्जुन खोतकर यांचे कथीत सहाय्यक किशोर काशिनाथ पाटील हे दिनांक १५ मे २०२५ पासूनच मुक्कामी दाखल झाले होते. स्वीय सहाय्यक या पदावर त्यांची नियुक्ती दिनांक १९/५/२०२५ रोजी झाली. दिनांक १५ मे २०२५ पासून मुक्कामी येवून तत्कालीन वादग्रस्त निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार यांच्या कार्यालयात बसून धुळे जिल्ह्यातील शासनाच्या व जिल्हा परिषद तसेच…

मग नीतीमूल्य समितीला कुठला नैतिक अधिकार आहे? आश्चर्याची बाब अशी की, मुख्य आरोपी किशोर पाटील हे धुळे न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत दावे दाखल करीत आहे. सरकारी वकील एक प्रकारे आरोपींनाच मदत होईल अशीच वर्तणूक करीत आहेत. सुरुवातीला अदखल पात्र गुन्हा दाखल केला. मा. न्यायालयाने अनिल गोटेंच्या अर्जावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. धुळे न्यायालयाचे आदेश मा. उच्च न्यायालयाने कायम केले. तरी सुद्धा आजतागायत एकालाही अटक झाली नाही. उलट जिल्हाधिकारी कार्यालयातील सी.सी.टी.व्ही. फूटेज गायब करण्यात आले. कशाचे लक्षण आहे हे? कसले हे नीती मूल्य ? ९ महिन्याच्या प्रदिर्घ कालखंडात नीती मूल्य समितीच्या या दोन्ही सदस्यांनी गोळा केलेल्या खंडणी प्रकरणाशी आपला काही संबंध नाही असल्या दोन ओळींचा खुलासा सुद्धा केला नाही. ही यांची नैतिकता !

सदर पार्श्वभूमीवर श्री. अनिल अण्णा गोटे यांनी नीती मूल्य समितीचे अध्यक्ष व त्यांच्या सदस्यांना एक पत्र पाठविले आहे. आपल्या पत्रात म्हटले आहे की,

सप्रेम नमस्कार, लोकसभेच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या नितीमूल्य समितीच्या पहिल्याच अध्यक्षपदी तसेच सदस्य म्हणून आपली निवड झाली याबाबत मी आपले मनापासून अभिनंदन करतो. धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी गोळा केलेले बेहिशोबी रुपये १ कोटी ८४ लाख ८४ हजार रुपये सापडल्याच्या अत्यंत धक्कादायक घटनेनंतर, आपली सदर समितीच्या सदस्यपदी निवड झाली, ही स्वागतार्ह बाब आहे. तसेच आपली निवड कुठल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर झाली, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठीच आपणास हे पत्र लिहीत आहे.

आपणास मी हे पत्र पाठवीत असताना, आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पहिल्या प्रकरणांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. उदाहरणार्थ दिनांक २१ मे २०२५ रोजी धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात घडलेली घटना ही आमदारांसाठी फार धक्कादायक वगैरे नाही. १५ वर्षाचा मलाही विधिमंडळाच्या कामकाजाचा थोडा बहुत का होईना पण अनुभव आहे. यासाठीच मुद्दाम आपणास हे पत्र लिहीत आहे. धुळे येथे घडलेला प्रकार हा तुम्हाला, मला, तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, कोणालाही अनपेक्षित नव्हता. सदर चौकशी समितीने धुळ्याच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी, राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या आमदारांपुढे आपले मनोगत व्यक्त करताना आमदारांना सूचना दिल्याचे मी वृतपत्रात वाचले.

विधीमंडळाच्या निरनिराळ्या समितीच्या नावावर पैसे गोळा केले जात असल्यामुळे या समित्या बदनाम झाल्या होत्या असे अतिशय स्वच्छ शब्दात त्यांनी आमदारांसमोरच्या भाषणात सांगितले. एवढेच नव्हे तर, काळजी घेण्याच्या काही सूचनाही त्यांनी केल्या, याचा अर्थ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशी कुठलीही घटना घडू नये. असे अपेक्षित असावे. तरीही धुळे गुलमोहोर प्रकरण घडलेच !

नंतर मुख्यमंत्र्यांनी दोन घोषणा केल्या. (१) आपण सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन दिवसात स्वतंत्र एस.आय.टी. स्थापन करू. (२) आमदारांच्या दौऱ्याच्या वेळी पाळावयाची नितीमूल्य स्थापन करू. मुख्यमंत्र्यांचे दोन दिवस पुर्ण न झाल्याने, अजूनही एस. आय.टी. स्थापन केलेली नाही. पण नितीमूल्य समिती मात्र स्थापन केली आहे. माझी नितीमूल्य समितीच्या आपणा सर्व सदस्यांना विनंती आहे की, स्थापन केलेल्या आपल्या नितीमूल्य समितीबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला पाहीजे. त्यासाठी पहिली चौकशी आपण दिनांक
२१ मे २०२५ रोजी धुळे येथील गुलमोहर विश्रामगृहावर घडालेल्या प्रकरणाचीच चौकशी करून, वस्तुस्थिती विदीत करणारा अहवाल किंवा क्षेत पत्रिका प्रसिद्ध करणे आवश्यक आहे? खरोखरच नेमके काय घडले हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर एकदा आले पाहिजे व आपण खऱ्या अर्थानि निपःक्ष राह, राज्याच्या जनतेला याची खात्री दिली पाहिजे. असे माझे स्पष्ट मत आहे. यासाठी सर्वप्रथम गुलमोहर घटनेची चौकशी करण्याचे काम आपण हाती घ्यावे. या विनंतीसह पत्र पूर्ण करतो, असे खडे बोल अनिल अण्णा गोटे यांनी सुनावले आहेत.

 

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा