Ankush Tv 18 News network
दिनांक. 09/08/2025 रोजी धरणगाव पोलीस स्टेशन चे पोलीस अमंलदार पोहेकाँ /526 सुधीर आनंदा चौधरी, पोहेकाँ 2221 सत्यवान बाबुराव पवार, पोकाँ 176 किशोर देविदास भोई, होमगार्ड निखील चौधरी असे धरणगाव शहरातील अमळनेर चौफुली येथे 22.00 वा ते 24.00 वा पावेतो नाकांबदी करीत असतांना रात्री सुमारे 23.00 वा सुमारास चोपडा रोडकडुन एक मारोती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार येतांना दिसल्याने त्यांनी तिला थांबण्याचा इशारा केला असता त्यावरील चालक याने कार न थांबविता जोरात धरणगाव शहरात चालवुन घेवुन गेला त्यांनतंर पोहकाँ 526 सुधीर चौधरी व पोकाँ 76 किशोर भोई यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असता सदर वाहन चालक याने त्याच्या ताब्यातील कार धरणगाव शहरातील एच.डी.एफ. सी. बँकेच्या समोरुन वळवुन पुन्हा पारोळा नाका परिसरातुन पारोळा रोडाकडील रेल्वे बोगदयाकडेस वेगात घेवुन गेला होता. तेव्हा पोलीस अमंलदार यांनी वाहनाचा पाठलाग करुन वाहनाचा शोध घेतला असता सदर वाहन हे पारोळा रोडाजवळील कच्च्या रस्त्यावरील बाभळीच्या झाडाच्या आडोशाला उभे दिसले तेव्हा सदर वाहनातील चालक हा कार मध्ये नव्हाता तो कार सोडुन पळुन गेलेला होता म्हणुन पोहेकाँ /526 सुधीर आनंदा चौधरी, पोहेकाँ/ 2221 सत्यवान बाबुराव पवार, पोकाँ 176 किशोर देविदास भोई यांनी मारोती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर मेटालिक सिल्वर रंगाची कार क्रमांक. MH01 DP 0252 कार ची तपासणी केली असता त्यात एकुण 10,10,600/- रुपये किमंतीचा 40 किलो 424 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा पालापाचोळा असलेला गांजा आढळुन आल्याने त्यांनी लागलीच धरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. सुनिल पवार सो यांना सदर बाबत माहीती दिल्यावरुन प्रभारी अधिकारी सुनिल पवार यांनी मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये सदर ठिकाणी फॉरेन्सिक टीम सह कायदेशीर कार्यवाही करुन सदर कार्यवाही पूर्ण झाल्यावर धरणगाव पोलीस स्टेशनला येवुन स्विफ्ट डिझायर कार क्रमांक. MH01 DP 0252 वरील चालक याने विना परवाना बेकायदेशीर रित्या सुका हिरवट रंगाचा 40 किलो 424 ग्रॅम वजनाचा 10,10,600/- रुपये किमंतीचा गांजा विक्री करण्यासाठी कार क्रमांक MH01 DP 0252 मध्ये बाळगुन तिची वाहतुक करतांना मिळुन आला म्हणुन पोकाँ / 76 किशोर देविदास भोई यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मारोती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर मेटालिक सिल्वर रंगाची कार क्रमांक. MH01 DP 0252 वरील चालक यांच्या विरुध्द धरणगाव पोलीस स्टेशनला NDPS ACT प्रमाणे गुन्हा नोद
करण्यात येवुन कारसह एकुण 20,10,600 /- रुपये किमंतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. धरणगाव पोलीसांनी ही कारवाई मा. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा.अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर-पवार व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल पवार, धरणगाव पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकाँ /526 सुधीर आनंदा चौधरी, पोहेकाँ 2221 सत्यवान बाबूराव पवार, पोहेकाँ / 2830 राजु पितांबर पाटील, पोका 176 किशोर देविदास भोई, पोकाँ / 312 चंदन विष्णु पाटील, पोकाँ /1912 सुमित बाविस्कर, पोकाँ 2270 संदीप पाटील यांनी सहभाग घेतला असुन सदर ची संपुर्ण कारवाई केलेली असुन पुढील तपास पोउपनि संतोष काशिनाथ पवार हे करीत आहेत.