Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » दुगड ग्रुप आयोजित रक्तदान व महिला आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न.

दुगड ग्रुप आयोजित रक्तदान व महिला आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न.

Trending Photos

Ankush tv18 news network

pune

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

दुगड ग्रुप तर्फे कै. हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिर व महिला आरोग्य तपासणी शिबिर बिबेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदाते आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या शिबिराचे उद्घाटन जैन श्रावण संघाचे व जैन सोशल इंटरनॅशनल फेडरेशनचे चेअरमन रवींद्र शहा आणि जैन सोशल महाराष्ट्र फेडरेशनचे चेअरमन दिलीप मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 960 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच महिला आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे 300 महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे खासदार मेघाताई कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, बाबा शेठ मिसाळ, शहर सुधारणा समिती अध्यक्षा स्मिताताई वस्ते, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, अभय छाजेड, ॲड, एस. के. जैन, राकेश सांकला, अभय मेहता, मनोज छाजेड, ललित शिंगवी, सुनील नहार अनिल नहार, पोपट
ओस्तवाला, अनिल भन्साळी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी हेमंत रायसोनी, महेंद्र सुंदेचा, नरेंद्र बलदोटा, परेश बोरा, राहुल मनोत, राहुल संचेती, दुगड ग्रुपचे प्रमोद दुगड, प्रवीण दुगड, महेंद्र दुगड, वृषभ दुगड, गौरव दुगड, मनोज दुगड, संदीप दुगड, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा