विकी उर्फ पवन खुमकर यांनी दिला मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा
ANKUSH TV18 NEWS NETWORK
अकोट, जिल्हा अकोला प्रतिनिधी ( निळकंठ प्रल्हाद वसू )
अकोट तालुक्यातील बेलखेड (ता. तेल्हारा) येथील मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष विकी उर्फ पवन खुमकर यांनी मराठा समाजासाठी चालवलेल्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवत मुंबई गाठली आहे. मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला बळ देण्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग वाढत आहे.
खुमकर यांनी सांगितले की, “मराठा समाजाच्या हक्कासाठी आणि आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी आपण सर्वजण एकत्र आहोत. हे आंदोलन आपल्या भविष्यासाठी आहे, आणि आपण हे यशस्वी करूनच थांबणार.”
त्यांच्या या सहभागामुळे तालुक्यातील युवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या हक्कांसाठी आता ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे या घटनाक्रमातून दिसून येते.