Ankush tv18 news network
तेलंगणा-
बोधन न्यायालयातील न्यायाधीश एस. साई शिवा यांनी न्यायालयाच्या बाहेर रस्त्यावरच वृद्ध दांपत्याला निर्दोष घोषित करत निकाल दिला!
आरोग्य खालावलेले व शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेले हे दांपत्य रिक्षाने न्यायालयात आले होते, पण पायऱ्या चढणे त्यांना शक्य नव्हते.
त्यांची अवस्था पाहून न्यायाधीश स्वतः बाहेर आले आणि मानवी संवेदनशीलतेचा परिचय देत त्यांनी कोर्टरूमबाहेरच 498A कलमान्वये सुरू असलेल्या प्रकरणात निर्दोषत्वाचा निकाल दिला.
या निर्णयाने न्याय मिळतोय एवढंच नव्हे तर मानवतेलाही न्याय मिळतोय हे सिद्ध झालं.
हा प्रसंग भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात संवेदनशीलतेचा एक अनोखा आदर्श म्हणून लक्षात राहील.