Home » क्राइम » तरुणास चारचाकी वाहनातुन लिफ्ट देण्याच्या बहाण्याने हातचलाकी करुन २२,५००/- रु रोख व मोवाईल फोनची चोरी करणारे चोर एमआयडीसी पोस्टे चे गुन्हे शोध पथकाकडून जेरबंद करुन चोरीचा संपुर्ण मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हस्तगत

तरुणास चारचाकी वाहनातुन लिफ्ट देण्याच्या बहाण्याने हातचलाकी करुन २२,५००/- रु रोख व मोवाईल फोनची चोरी करणारे चोर एमआयडीसी पोस्टे चे गुन्हे शोध पथकाकडून जेरबंद करुन चोरीचा संपुर्ण मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हस्तगत

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

ANKUSH TV18 NEWS NETWORK 

दि.२५/०८/२०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एक ईसम अजिंठा चौकात महामार्गावरील बस स्टॉप जवळ धुळे येथे जाणेकरीता बस ची वाट बघत असतांना एक चारचाकी वाहन त्यांच्या जवळ थांबुन चारचाकी वाहनातील अज्ञात ईसमांनी त्यांस कुठे जायचे आहे बाबत विचारणा केली असता सदर ईसमाने धुळे येथे जायचे असले बाबत सांगितले असता आम्ही तुला सोडून देतो असे विश्वास संपादन करुन, सदर चारचाकी वाहनात मागे इतर प्रवासी बसल्याचा बहाना करुन पुढील शिट वर दाटीवाटी करुन बसविले. थोडे अंतर पार केलेवर सदर ईसमास वाहनात जागा बसण्यास जागा नाही म्हणून खाली उतरवुन दिले. खाली उतरले नंतर आपल्या खिशातील मोबाईल बघता तो मिळून आला नाही व खिशात असलेले २२,५००/- रु रोख रक्कम असे चोरी झाल्याचे लक्षात आलेवर त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठुन झालेली हकीकत सांगितले. श्री बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी सदर ईसमास धिर देवुन झालेल्या घटनेची विचारपुस करुन तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकों गणेश शिरसाळे, पोहेकों प्रमोद लाडवंजारी, पोहेकों किरण चौधरी पोहेकों गिरीश पाटील पोना प्रदीप चौधरी, पोकों नरेंद्र मोरे यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करुन सिसिटीव्ही द्वारे शोध घेवुन गोपनीय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करुन आरोपीतांचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या व फिर्यादी यांच्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन CCTNS गुरन ६१८/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वर नमुद गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळावरील उपलब्ध व नेत्रम विभागचे पोकों कुंदनसिंग बयास यांच्या मदतीने सिसिटीव्ही फुटेज प्राप्त करुन व गोपनिय बातमीदारां मार्फत संशयित आरोपीतां बद्दल माहिती मिळवली. सदर पथकाने तात्काळ गुन्हा करणारे आरोपीतांचा शोध घेवुन नशिराबाद ता जि जळगाव येथील बाजार परिसरात सापळा रचुन संशयित आरोपी नामे १. वसिम अजमल खान वय ३५, रा. नशिराबाद ता जळगाव २. जाफर उल्ला कहुल्ला कासार वय ४२, रा साथी बाजार नशिराबाद, ता. जळगाव यांना शितफीने ताब्यात घेवुन सखोल चौकशी करीता त्यांनी सदर चोरी त्यांचे इंतर दोन साथीदार यांच्या सोबत मिळुन केली असलेची कबुली देवुन चोरी केलेला मुद्देमाल २२,५००/- रु रोख रक्कम, चोरी केलेला मोबाईल फोन, आरोपीतांकडून जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरलेले सुमारे ५,००,०००/- रु किमतीचे मारुती अर्टीगा चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आले आहे.

सदर आरोपी नामे १. वसिम अजमल खान वय ३५, रा. नशिराबाद ता जळगाव २. जाफर उल्ला कहुल्ला कासार वय ४२, रा साथी बाजार नशिराबाद, ता. जळगाव यांना गुन्ह्याकामी अटक करण्यात आले असून मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीतांना ०२ दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदर अटक आरोपी यांच्यावर यापुयो विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असुन तपासादरम्यान अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना प्रदीप चौधरी, एमआयडीसी पोस्टे जळगाव हे करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते सो, पोलीस उप अधीक्षक श्री नितीन गणापुरे सो यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात आली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा