ANKUSH TV18 NEWS NETWORK
बिलोली प्रतिनिधी गणेश कदम
बिलोली तालुक्यातील टाकळी येथे आलेल्या पुरामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली, घरगुती साहित्य पाण्यात बुडाले, तसेच गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार मा. जितेश अंतापूरकर साहेब यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी टाकळी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आमदार साहेबांनी गावकऱ्यांना दिलासा देत शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी, तसेच पीडित शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी शासनाकडे केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला सुद्धा योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. पूरामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना आमदार अंतापूरकर साहेबांच्या भेटीमुळे धीर मिळाला असून गावकऱ्यांनी शासनाने लवकरात लवकर मदतीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.