ankush tv18 news
मुंबई : जागतिक ग्राहक दिनानिमित्त RTI Human Rights Activist Association तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता Sharadashram Vidyamandir, दादर (पश्चिम), मुंबई येथे पार पडणार आहे.


या कार्यशाळेमध्ये माहितीचा अधिकार कायदा २००५, मानवाधिकार कायदा, ग्राहक संरक्षण कायदा २०१९, लोकपाल व लोकायुक्त कायदा २०१३, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध प्रभावी लढा या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अब्राहाम आढाव सर तसेच असोसिएशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. श्री. कामेश घाडी सर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. राजेश माकोडे असतील.
या कार्यशाळेसाठी नोंदणी शुल्क रुपये ३००/- इतके निश्चित करण्यात आले असून, सहभागी प्रशिक्षणार्थींना असोसिएशनतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या सभासदांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी कायदेविषयक पुस्तकांचे स्टॉल तसेच असोसिएशनची माहिती व नोंदणी सुविधा उपलब्ध असेल. उपस्थितांसाठी चहा, अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी असोसिएशनच्या असोसिएशन हेल्पलाइन नंबर : 9930992255 / 8976300945 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





