जवखेडे सिम गावात गालापुर रोडला लागुन असलेल्या काटेरी झुडपाच्या आडोशाला काही इसम जुगाराचा खेळ खेळत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने त्यांनी पो.ना. १६१८ प्रदिप पाटील, पोकों / १७१८ समाधान तोंडे, पोकॉ/१६६७निलेश नाना गायकवाड, पोकॉ/१९९७ योगेश अरुण पाटील अशांना तात्काळ कारवाई करणे कामी रवाना केले सदर घटनास्थळाच्या अलिकडे रस्त्यावर पोलीस पथकाने वाहने थांबवुन तेथून पायी चालत जावुन काटेरी झुडपाच्या आडोशाला काही इसम खाली जमिनीवर बसून घोळका करुन पैसे टाकुन पत्याचा खेळतांना दिसले. त्यांचेवर १५.२५ वाजेच्या सुमारास छापा टाकून त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.
सदर पकडलेल्या ईसमांमध्ये १) सोनु धाकु भिल वय ५० वर्ष, २) विरभान श्रावण भिल वय-४० वर्ष, ३) राहुल संतोष सोनवणे वय-२६ वर्षे, ४) प्रविण वंसत सोनवणे वय-३९ वर्षे ५) संतोष माधव सोनवणे वय-३० वर्षे ६) सुनिल दगा ठाकरे वय-३५ वर्ष, ७) मंगिलाल भाईदास चव्हाण वय ४५ वर्ष, ८) रतन धाकु भिल वय-६० वर्ष, ९) अशोक गोविंदा पाटील वय-५४ वर्ष, १०) सचिन बापु पवार वय-३७ वर्ष, ११) कांतीलाल महादु सोनवणे वय-३८ वर्ष, १२) उत्तम बालाआप्पा जेढें वय ५० वर्ष, १३) समाधान बापु पाटील वय-३५ वर्ष, १४) संभाजी महारु पाटील वय ५८ वर्ष, १५) सुनिल सिताराम वाघ, वय ४८ वर्ष सर्व रा. जवखेडे सिम ता. एरंडोल जि. जळगाव अशांचा समावेश असुन त्यांचे अंगझडती, पत्याच्या डावातुन ६,३९०/- रोख रक्कम व १,१५,०००/- रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली असा एकुण १,२१,३९०/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण् यात आला असुन त्याचेवर पोकाँ/५०१ दिपक देसले यांच्या फिर्यादी वरुन सदर इसमांविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कारवाई मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी सर, यांचे आदेशानुसार व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नेरकर मॅडम सो, व मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री विजय ठाकुरवाड यांचे मार्गदर्शनाखाली मा. सपोनि निलेश राजपुत पोहेक२१५३ नंदलाल परदेशी, पोना/१६१८ प्रदिप पाटील, पोकॉ/१७१८ समाधान तोंडे, पोकॉ/१६६७निलेश गायकवाड, पोकॉ/१९९७ योगेश पाटील, पोकॉ/६८२ कुणाल देवरे, पोकों/५०१ दिपक देसले, पोकॉ/२०२१ लहु हटकर अशांचा सहभाग होता.