Ankush tv18 news network
संपादकीय –
“जळगावात गुन्ह्यांचा स्फोट? विविध अवैध कारवायांनी शहर हादरले”?
जळगाव शहरात वाढती गुन्हेगारी “हप्त्यांच्या सावलीत जळगाव; नेत्यांचे मौन नेमके कोणासाठी ?

जळगाव : जळगाव शहरात वाढती गुन्हेगारी आता केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राहिलेला नाही
याहून गंभीर बाब म्हणजे, या सर्व घडामोडींवर राजकीय नेतृत्वाचे मौन. मंत्री, आमदार, खासदार—कोणीही स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाही.
हे मौन योगायोग आहे की सोयीचे शांत राहणे?
प्रशासन कारवाई करत असल्याचे सांगते, पण जमिनीवर परिस्थिती बदलते आहे का?
जर ‘हप्ते’ व्यवस्थेचा पाय रोवला गेला असेल, तर तो उखडून टाकण्यासाठी केवळ पोलिसी कारवाई पुरेशी ठरणार नाही..
जळगाव : गेल्या काही वर्षांत जळगाव शहर आणि परिसरात विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा आहे.
शहरात वाळू चोरी, सट्टा-मटका, अवैध दारू विक्री, तसेच देहव्यापारासारख्या गैरकृत्यांच्या हालचालींबाबत चर्चा होत आहे. याशिवाय सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, फसवणूक आणि ऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांनी नागरिक त्रस्त आहेत.
याचबरोबर, महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलींचे अपहरण, खून, हत्याकांड, बलात्कार आणि अल्पवयीन विवाह यांसारख्या गंभीर गुन्ह्यांनी परिस्थिती अधिकच चिंताजनक बनवली आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, काही प्रकरणांमध्ये भीतीमुळे तक्रारी पुढे येत नाहीत. तर दुसरीकडे, या सर्व घडामोडींवर राजकीय स्तरावर अपेक्षित ती ठोस भूमिका दिसत नसल्याची चर्चा आहे.
पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी नागरिकांना अधिक प्रभावी आणि दृश्यमान परिणामांची अपेक्षा आहे.
तर ती एका खोलवर रुजलेल्या ‘हप्ते संस्कृती’ची परिणती असल्याची चर्चा उघडपणे होऊ लागली आहे. ?
लोकप्रतिनिधी
| मतदारसंघ नाव | मतदारसंघ प्रकार | लोकप्रतिनिधीचे नाव | पक्ष |
|---|---|---|---|
| 03-जळगाव | संसद सदस्य | श्रीमती स्मिता उदय वाघ | भारतीय जनता पार्टी |
| 04-रावेर | संसद सदस्य | श्रीमती रक्षा निखिल खडसे | भारतीय जनता पार्टी |
| 10-चोपडा (अज) | विधानसभा सदस्य | चंद्रकांत बळीराम सोनवणे | शिवसेना |
| 11-रावेर | विधानसभा सदस्य | अमोल हरिभाऊ जावळे | भारतीय जनता पार्टी |
| 12-भुसावळ(अजा) | विधानसभा सदस्य | सावकारे संजय वामन | भारतीय जनता पार्टी |
| 13-जळगाव शहर | विधानसभा सदस्य | सुरेश दामू भोळे (राजू मामा) | भारतीय जनता पार्टी |
| 14-जळगाव ग्रामीण | विधानसभा सदस्य | गुलाबराव रघुनाथ पाटील | शिवसेना |
| 15-अमळनेर | विधानसभा सदस्य | अनिल भाईदास पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी |
| 16-एरंडोल | विधानसभा सदस्य | अमोल चिमणराव पाटील | शिवसेना |
| 17-चाळीसगाव | विधानसभा सदस्य | मंगेश रमेश चव्हाण | भारतीय जनता पार्टी |
| 18-पाचोरा | विधानसभा सदस्य | किशोर आप्पा पाटील | शिवसेना |
| 19-जामनेर | विधानसभा सदस्य | गिरीश दत्तात्रय महाजन | भारतीय जनता पार्टी |
| 20-मुक्ताईनगर | विधानसभा सदस्य | चंद्रकांत निंबा पाटील | शिवसेना |
व्यापारी आणि सामान्य नागरिकांकडून दबावाखाली पैसे उकळले जात असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या प्रकरणांमध्ये तक्रारींचा अभाव हा भीतीचा परिणाम आहे का, की व्यवस्थेवरील अविश्वासाचा — हा मोठा प्रश्न आहे.





