Home » ताज्या बातम्या » जळगाव शहरातील मारुती कंपनीची स्विफ्ट डिझाअर कार चोरी – छत्रपती संभाजी नगर येथे वाहन जप्त

जळगाव शहरातील  मारुती कंपनीची स्विफ्ट डिझाअर कार चोरी – छत्रपती संभाजी नगर येथे वाहन जप्त

Trending Photos

कारचोरीचा गुन्हा एमआयडीसी पोस्टे कडून उघड, चोरी गेलेले चारचाकी वाहन हस्तगत.

जळगाव शहरातील    फिर्यादी यांनी दि.१९/११/२०२५ रोजी रात्री ०८.०० वाजेच्या सुमारास त्यांच्या मालकीची मारुती कंपनीची स्विफ्ट डिझाअर कार त्यांच्या राहत्या घरासमोर पार्किंग केले होते. दि.२०/११/२०२५ रोजी सकाळी उठले असता घरासमोर पार्किंग केलेली कार दिसुन न आल्याने आजुबाजुचे परिसरात शोध घेता मिळुन न आल्याने व सदर चारचाकी वाहनाची अज्ञात ईसमाने चोरी केल्याची खात्री झाल्याने एमाआयडीसी पोलीस स्टेशन गुरन ८५७/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुप्त बातमिदारांकडून गोपनिय बातमी काढून व सिसिटीव्ही फुटेजचे बारिकाईने विश्लेषण करुन सदर गुन्हा करणा-या आरोपीतांची ओळख पटवुन सदर आरोपीतांची माहिती काढून सदर गुन्हा करणारे आरोपीतास जळगाव शहरातील नवानाथ नगर भागात सापळा रचुन शिताफीने दि.२३/११/२०२५ रोजी ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने त्यांचे नाव विनय मनोहर जाधव रा नवनाथ नगर, जळगाव असे सांगुन त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन त्याने सदरच्या गुन्ह्यात चोरी केलेले वाहन छत्रपती संभाजी नगर येथे घेवुन गेले बाबतची कबुली दिली. सदर गुन्ह्यातील चोरी गेलेले सुमारे ४,५०,०००/-रु किमतीचे स्विफ्ट डिझायर वाहन जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव चे पोनि बबन आव्हाड यांनी आवश्यक सुचना देवुन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोह प्रदीप चौधरी, पोह रमेश चौधरी, पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोह गिरीश पाटील, पोकों विशाल कोळी, पोकों नितीन ठाकुर, पोकों किरण पाटील, पोकॉ शशिकांत मराठे, पोकॉ नरेंद्र मोरे अशांनी केली आहे.

सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा