जळगाव पोलीस , CMOMaharashtra Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलिस मुख्यालय. मुंबई
Ankush tv18 news network
जळगाव महानगरपालिका आयुक्त श्री. ज्ञानेश्वर ढेरे, आयुक्त निवास, शिवाजी नगर, गेंदालाल मील वॉल कंपाऊंड, जैन मन्दिरा जवळ, जळ्गाव. ४२५००१ यांना मागील सुमारे एका महिन्यापासून पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. या बंदबस्तासाठी खालील दोन कर्मचारी जळगाव पोलीस मुख्यालयकडून सतत नियुक्त आहेत:
१. पोलीस हेड कॉस्टेबल श्री. प्रशांत विश्वनाथ जाधव (बक्कल क्र. २८२१), सध्या नेमणूक – पोलीस मुख्यालय, जळगाव
२. पोलीस हेड कॉस्टेबल श्री अविनाश बापूराव देवरे (बक्कल क्र. ३२४२), सध्या नेमणूक – पोलीस मुख्यालय, जळगाव
परंतु, राज्य शासनाच्या प्रोटेक्शन प्रोटोकॉल यादीत मनपा आयुक्तांचे नाव नाही, तसेच या बंदोबस्ताबाबत मनपा प्रशासनाकडून कोणतेही शासकीय शुल्क वसूल करण्यात आलेले नाही. राखीव पोलिस निरीक्षक श्री. प्रशांत सुगरवार यांच्याकडे शासन परिपत्रक क्र. संकीर्ण२०१८/प्र.क्र.४५/कार्य-६, दि. २६ नोव्हेंबर २०१८ अन्वये अभिलेख अवलोकनासाठी दीपककुमार पी. गुप्ता आरटीआय ट्रेनर व सोशल ऍक्टिविस्ट, जळगाव माहिती अधिकारात माहिती उघड माहिती मागितली असता, त्यांनी सांगितले की हा बंदोबस्त माननीय SP साहेबांचा केवळ तोंडी आदेश आहे. मात्र, याबाबत ना कुठे लेखी नोंद आहे, ना स्टेशन डायरीत नोंद, आणि ना मनपा आयुक्तांकडून लेखी मागणीपत्र आहे.
जिल्हा पोलीस विशेष शाखेकडूनही यासंदर्भात स्पष्ट नकार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त आदेशानुसार १६/०९/२०२५ ते २२/०९/२०२५ या कालावधीत सुनावणीदरम्यान ०१ पुरुष व ०१ महिला पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश आहेत.
म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की, दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा महिनाभराचा पगार पोटी शासनाला झालेला आर्थिक तोटा याची जबाबदारी कोणाची? कारण या संदर्भात कोणताही शासकीय आदेश अथवा शुल्क वसुली झालेली नाही. जळगाव महानगरपालिका आयुक्त यांना पोलीस अधीक्षक यांच्या तोंडी आदेशान अनधिकृत 3 पोलिसांचा अनधिकृत पोलीस बंदोबस्त ! कायदा व नियमाची पायमल्ली करण्यात आलेली दिसून येते आणि शासकीय रकमेच्या वसुली बाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.