Ankush tv18 news network
Jalgaon

जळगाव जिल्यातुन हद्दपार केलेल्या सराईत गुन्हेगारास दोन साथीदारांसह गावठी कट्टा, जिवंत काडतुस व धारदार कोवतासह एमाआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या ताव्यात.
जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात राहणारा तेजस दिलीप सोनवणे या सराईत गुन्हेगारास मा.उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांच्या आदेशान जळगाव जिलप्रातुन ०२ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेले आहे. सदर हदपार असलेला ईसम हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन त्याचा साथीदारांसह घातक हत्यारांसह दहशत माजविण्याच्या उद्देशाने जळगाव शहरातील नेहरु नगर परिसरात फिरत असले बाबतची गोपनिय बातमी दि.२५/१०/२०२५ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना प्राप्त झाली. सदर गोपनीय बातमीच्या अनुषंगाने पोनि बबन आव्हाड यांनो वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोस्टे चे गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, सफौ विनसिंग पाटील, पोह गणेश शिरसाळे पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोकी गणेश ठाकरे, पोकों फिरण पाटील, पोकों नितीन ठाकुर, पोकों राहुल घेटे, पोकों योगेश घुगे अशांचे पथक नेमुण सदर पथकास योग्य त्या सूचना देवून कारवाई करणे बाबत आदेशित केले.
बर नमुद गुन्हे शोध पथकान तात्काळ जळगाव शहरातील शिरसोली रोड भागातील नेहरु नगर भागात गोपनिय माहिती काढून नेहरु भागात संदीपनी बॉईज हॉस्टेल परिसरात सापळा रचुन संशयितरित्या हालचाल करणा-या तिन युवक मिळून आल्याने सदर संशयित ईसमांना पंचासमक्ष नाव गाव विचारता त्यांनी अनुक्रमे १) तेजस दिलीप सोनवणे वय २५, रा कांचन नगर जळगाव, २) खुशाल पितांचर सोनार, वय २१ रा. पार्वताचाई ओकनगर, कांचन नगर जळगाव, ३) चेतन पितांबर सोनार, यद २३, रा पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर जळगाव असे सांगितले.
सदर मिळून आलेल्या ईसमांपैकी संशयित ईसम क्रं.१) तेजस दिलीप सोनवणे वय २५, रा कांचन नगर जळगाव, यास मा. उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांच्या आदेशान जळगाव जिल्ह्यातुन ०२ वर्षाकरीता हरपार करण्यात आलेले असतांना देखील तो हद्दपार आदेशाचे उल्लंघन करतांना मिळून आला. संशयित ईसम क्र.२) खुशाल पितांबर सोनार, वय २१ रा. पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर जळगाव याचे अंगझडती मध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस मिळून आले. तसेच संशयित ईसम क्र.३) चेतन पितांबर सोनार, वय २३, रा पार्वताबाई ओकनगर, कांचन नगर जळगाव याचे अंगझडीमध्ये धारदार पाते असलेला लोखंडी कोयता मिळूल आल्याने सदर संशयित ईसमांना त्यांचे ताब्यात मिळून आलेले घातक हत्यारांसह ताब्यात घेवून एमआयडीसी पोस्टेला सिसिटीएनएस गुरन ७४९/२०२५ आर्म्स अॅक्ट ३/२५,४/२५, महाराष्ट्र पोलीस अधिनिअम कलम १४२ व ३७ (१) (३) चे उल्लंधन १३५, सह भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याने सदर आरोपीतांना अटक करुन मा. न्यायालयात हजर केला असता त्यांना ०३ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. सदर गुन्हाचा तपास पोउनि राहुल तायडे करीत व पोकी चेतन पाटील करत आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, मा. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग, पोलीस निरीक्षक बबल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.
Please accept YouTube cookies to play this video. By accepting you will be accessing content from YouTube, a service provided by an external third party.
If you accept this notice, your choice will be saved and the page will refresh.





