Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून सरदार वल्लभ भाई पटेल यांची १५० वी जयंती निमीत्त ‘वॉक फॉर यूनिटी’ चे आयोजन

जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून सरदार वल्लभ भाई पटेल यांची १५० वी जयंती निमीत्त ‘वॉक फॉर यूनिटी’ चे आयोजन

Trending Photos

Ankush tv18 news network

jalgaon-वॉक फॉर युनिटी या ५ कि.मी. वॉकींग रॅलीला मा. जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे व मा. पोलीस अधीक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरुवात

जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून सरदार वल्लभ भाई पटेल यांची १५० वी जयंती निमीत्त 'वॉक फॉर यूनिटी' चे आयोजन
जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून सरदार वल्लभ भाई पटेल यांची १५० वी जयंती निमीत्त ‘वॉक फॉर यूनिटी’ चे आयोजन
वॉक फॉर युनिटी या ५ कि.मी. वॉकींग रॅलीला मा. जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे व मा. पोलीस अधीक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरुवात
वॉक फॉर युनिटी या ५ कि.मी. वॉकींग रॅलीला मा. जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे व मा. पोलीस अधीक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरुवात

जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून सरदार वल्लभ भाई पटेल यांची १५० वी जयंती निमीत्त ‘वॉक फॉर युनिटी’ या उपक्रमा अंतर्गत ५ कि.मी. वॉक चे आयोजन दि. २५/१०/२०२५ रोजी सकाळी ०७:०० वा. शहर वाहतुक शाखा जळगाव येथे करण्यात आले होते. राष्ट्राच्या ऐक्य, अखंडता आणि बंधुतेचा संदेश देण्यासाठी ‘वॉक फॉर यूनिटी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, सामाजिक सलोखा आणि सहकार्याची भावना दृढ करणे हा आहे.

या कार्यक्रमात पोलीस अधीकारी/अंमलदार, शहरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी, श्री. नितीन गणापुरे हे उपस्थित होते. सकाळी 7 वाजता शहर वाहतुक शाखा येथून या वॉकची सुरुवात करण्यात आली. वॉक दरम्यान एकता, शांतता आणि देशभक्तीचा संदेश देण्यात आला.   वॉक फॉर युनिटी या ५ कि.मी. वॉकींग रॅलीला मा. जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे व मा. पोलीस अधीक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरुवात केली. शहर वाहतुक शाखा येथुन रॅलीला सुरुवात होवुन स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डी मार्ट पर्यंत व तेथुन परत पोलीस कवायत मैदान असा रॅलीचा मार्ग होता. कार्यक्रमाची सांगता पोलीस कवायत मैदान येथे झाली मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकात्मतेच्या कार्याचा उल्लेख करुन सर्वांना एकतेचा संदेश दिला. वॉक फॉर युनिटी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस निरीक्षक, श्री. संदीप पाटील, मानव संसाधन विभाग, राखीव पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत सुगरवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगीता नारखेडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री.चिवंडे, सर्व कवायत निर्देशक व वेल्फेअर अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा