Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » जळगावत प्रथमच पांजरापोळ संस्थेत गौकृपा कथेचे सुंदर गोकथा.. आयोजन -जळगाव येथे साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदीजी आगमन

जळगावत प्रथमच  पांजरापोळ संस्थेत   गौकृपा कथेचे सुंदर गोकथा.. आयोजन -जळगाव येथे साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदीजी आगमन

Trending Photos

Ankush tv18 news network

दीदीनी आपल्या जळगाव येथील आर.आर.विद्यालयात प्राथमिक शिक्षण तर बांभोरी इंजिनीरिंग कॉलेज येथे बीटेक.शिक्षण 

जळगावत प्रथमच  पांजरापोळ संस्थेत   गौकृपा कथेचे भव्य आयोजन   — संगणक अभियांत्रिकी,मोठ्या पगाराची नोकरी,आणि संसार त्याग करत साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदीजी हजारो गाईंची निरपेक्ष सेवा करत देशभरात करत आहेत सुंदर गोकथा…

जळगाव – शहरातील पांजरापोळ संस्थेतर्फे जळगाव माहेश्वरी महिला मंडळाच्या सहयोगाने  पांजरापोळ संस्था गौतीर्थ नेरीनाका येथे दिनांक 11 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान, दुपारी 03 ते 06 यावेळेत शहरात प्रथमच  भव्य अलौकिक श्री गौकृपा कथेचे विशेष आयोजन करण्यात आले असून या कथेचा परिवारातील लहान ,थोर विशेषता युवा पिढीने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या भव्य श्री गौकृपा कथे करिता 31 वर्षीय कपिला गोपाल सरस्वती दीदीजी यांचे आज जळगाव येथे आगमन झालेले असून त्या संगणक अभियांत्रिकी (बीटेक)उच्चशिक्षित असून त्यांनी मोठ्या पगाराची   नोकरी आणि संसाराचा त्याग करून  अध्यात्मिक उन्नती,राष्ट्र सेवेकरिता दीक्षा स्वीकारून देशभरात दीदीजी यांनी हजारो गाईंची सेवा, गो वैद्यकीय उपचार सुरू केलेले असून आतापर्यंत देशभरात त्यांनी 400 पेक्षा जास्त गौकथा, गौराम कथा, भागवत कथा,नानी बाइका मायरा आदी भव्य कार्यक्रम केले आहे. तसेच जवळपास अकरा वर्ष त्यांनी अन्न त्याग,मोबाईल पासून लांब( मोबाईल वापरत नाहीत),पायात बुट, चप्पल घालत नाही

शुद्ध शाकाहारी, गो उत्पादनाचा आहार, व्यसनमुक्ती कार्य,शारीरिक कष्ट असलेल्यांना दीदींनी व्याधी मुक्त केलेल् आहे.विशेष म्हणजे दीदीनी आपल्या जळगाव येथील आर.आर.विद्यालयात प्राथमिक शिक्षण तर बांभोरी इंजिनीरिंग कॉलेज येथे बीटेक.शिक्षण घेतले आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा