Ankush tv18 news network
Jalgaon- मा. पोलीस अधीक्षक सो, जळगांव श्री डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्हयात घडणारे गंभीर गुन्हयांना प्रतिबंध होण्याचे दुष्ट्रीकोनातुन जळगांव जिल्हयातील सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना दि.१६/०९/२०२५ ते दि. ३०/०९/२०२५ दरम्यान अवैधरित्या अग्नीशस्त्र अनुषंगाने विशेष मोहिम राबवून कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते.
स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव तसेच पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीकरित्या विशेप मोहिम राबवून एकुण १० देशी बनावटीचे अग्नीशस्त्र व २४ जिवंत काडतुस जप्त करुन १२ आरोपी यांचे विरुध्द आर्म अॅक्ट अन्वये खालील प्रमाणे पोलीस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

सदरची कार्यवाही ही श्री डॉ. महेश्वर रेड्डी, मा. पोलीस अधीक्षक, सो. जळगांव श्री अशोक नखाते मा. अपर पोलीस अधीक्षक, सो, जळगांव परीमंडळ, श्रीमती कविता नेरकर, मा. अपर पोलीस अधीक्षक, सो. चाळीसगांव परीमंडळ, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी जळगांव जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव तसेच अधिकारी व अंमलदार व वर नमूद पो.स्टे.चे प्रभारी अधिकारी तसेच अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीकरित्या केली आहे.