Ankush tv18 news network -4 nov. 2025

जळगांव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेला श्वान जंजिरचा सेवा निवृत्तीबाबतचा कार्यक्रम मा. पोलीस अधिक्षक सो महेश्वर रेड्डी सर, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते सर श्वान पथक प्रभारी अधिकारी पो. उपनि देविदास वाघ श्वान हस्तक पोहेकॉ निलेश झोपे पोना प्रशांत कंकरे पोहेकॉ संदिप परदेसी यांच्या उपस्थीती पार पडला. श्वान जंजीर याचा जन्म 18-11-2017 रोजी झालेला आहे. तसेच त्याचे 9 महिन्याचे प्रशिक्षण गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे झालेले आहे.
श्वान जंजीर हा जळगांव जिल्हा पोलीस दलात 07-04-2018 पासुन कार्यकत होता. त्याने आज पावेतोच्या सेवेमध्ये चाळीसगांव पोस्टे, MIDC पोस्टे, भुसावळ शहर पोस्टे तसेच इतर पोस्टेचे गुन्ह्यात आरोपीतांचा योग्य मार्ग काढुन आरोपींचा शोध घेतलेला आहे. तसेच इतरही गुन्ह्यात आरोपींचा शोध घेणे कामी श्वान जंजिरने मोलाचे मार्गदर्शन केले आहे.





